nmc esakal
नाशिक

NMC News: मलजल, सांडपाण्याचे नव्याने ऑडिट! गोदावरी उपसमितीच्या बैठकीत निर्णय

सकाळ वृत्तसेवा

NMC News : आगामी सिंहस्थ कुंभमेळा प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार शासनाकडून व्यक्त झाल्यानंतर त्याअनुषंगाने महापालिका कामाला लागली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून शहरात निर्माण होणारे सांडपाणी, मलजल व मलनिस्सारण केंद्रातून बाहेर पडणारे प्रक्रियायुक्त पाण्याचे ऑडिट केले जाणार आहे. त्याचबरोबर शहर प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी शाळांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (NMC New audit of sewage sewage Decision of Godavari Sub Committee meeting nashik)

गोदावरी नदी प्रदूषणासंदर्भात निरी संस्थेने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी उपसमितीची बैठक आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, पर्यावरण विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, निरीचे डॉ. नितीन गोयल, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अमर दुर्गूळे उपस्थित होते.

धरणातून उपसले जाणारे पाणी, वापरानंतर मलजल वाहिन्यांमार्फत मलनिस्सारण केंद्रात सांडपाणी पोचते. तेथे पाणी पोचल्यानंतर प्रक्रिया होऊन नदीपात्रात सोडणे बंधनकारक आहे.

प्रत्यक्षात पाण्याचा वापर व प्रक्रिया करून नदीपात्रात सोडण्यापर्यंत पाण्याचा हिशोब तपासण्यासाठी ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्योगांकडून थेट नदीपात्रामध्ये केमिकलयुक्त पाण्याच्या लाईन सोडल्या जातात.

त्यामुळे प्रक्रिया न करता नदीमध्ये सांडपाणी सोडणाऱ्या उद्योगांवर कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. अमृत दोन योजनेंतर्गत मल जलशुद्धीकरण प्रकल्पांची क्षमता वाढविण्यासाठी शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला.

निळ्या पूररेषेतील अतिक्रमण हटविणे, प्लॅस्टिक बंदीच्या नियमाचे काटेकोरपणे अंमलबजावणी, सरकारी व खासगी शाळांमधून प्लॅस्टिक संदर्भात जनजागृती, शाळांमध्ये जमा होणाऱ्या प्लॅस्टिकवर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुलावर जाळी बसवणार

नदीपात्रात पुलांवरून निर्माल्य टाकले जात असल्याने त्यातून प्रदूषण होत आहे. त्यामुळे नद्यांवरील तेरा पुलावर जाळी बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT