nmc esakal
नाशिक

NMC News: शहरात 16 पर्यटनस्थळे विकसित होणार! महापालिकेचा सिंहस्थ आराखड्यात समाविष्ट

सकाळ वृत्तसेवा

NMC News : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आराखडा तयार करताना त्यात पर्यटनाचा स्वतंत्र आराखडा तयार केला जात असून, त्यात शहरातील सोळा पर्यटनस्थळे विकसित केले जाणार आहे.

पर्यटन आराखडा अंतिम झाला नसला तरी प्रकल्पांची किंमत जवळपास ६५ कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे. थीम पार्क, फेरी व रोप-वे याचा पर्यटन आराखड्यात समावेश आहे. (NMC News 16 tourist spots will be developed in city Included in Simhastha Plan of Municipal Corporation nashik)

आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ मध्ये होत असून, त्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. प्रशासनाकडून पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधीची मागणी केली जाणार आहे.

निधीसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत. त्याअनुषंगाने महापालिकेने ४३ विभागांना सिंहस्थासाठी लागणाऱ्या खर्चाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार जवळपास तीन हजार कोटींच्या वर आराखडा पोचला आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाला आठ दिवसांची नव्याने मुदत देत अंतिम आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या.

सिंहस्थाच्या आराखड्यात पर्यटन आराखड्याचा समावेश करण्यात आला आहे. पर्यटन आराखड्यात शहरातील सोळा पर्यटनस्थळांचा विकास केला जाणार आहे.

भाविकांबरोबरच नाशिककरांना कायमस्वरूपी पर्यटनस्थळांच्या माध्यमातून उत्पन्न व मनोरंजनाचे साधने उपलब्ध होणार आहे. जवळपास ६५ कोंटींचा आराखडा असून आराखडा अंतिम करण्याचे काम सुरू आहे.

थीम पार्क, जेटी अन्‌ रोप-वे

पर्यटन आराखड्यामध्ये थीम पार्क प्रस्तावित आहे. एक थीम घेऊन त्यावर आधारित उद्यानाची निर्मिती तसेच गोदावरी नदीपात्रामध्ये जेटी व बोटिंग चालविणे तसेच रोप-वेची संकल्पना आहे. निधी मिळाल्यानंतरच संकल्पना प्रत्यक्षात आणल्या जाणार आहे.

असा आहे आराखडा (कंसात अंदाजित रक्कम कोटीत)

- सोमेश्वर धबधबा (२.९७)

- महादेव मंदिर (९६ )

- नवशा गणपती मंदिर विकास (१.५२)

- बापू पार्क (११.०९)

- गोदापार्क (उजवी बाजू)- (१९.१२)

- कुसुमाग्रज उद्यान (७५)

- पंचवटी (५.००)

- नवी भाजी बाजार (२.३५)

- कपिला संगम (५.८७)

- वाघाडी- नाग चौक वॉटर फॉल (२.९२)

- नंदिनी-गोदावरी संगम (३.९२)

- समर्थ रामदास स्वामी मठ विकास (१.७०)

- दशरथ घाट, नांदूर (४.४१)

- फेरी- (४.००)

- रोप-वे (७.००)

- थीम पार्क (३.००)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT