NMC News esakal
नाशिक

NMC News: गणेशमूर्ती विक्रीचे 151 स्टॉल्सचे लिलाव तहकूब

सकाळ वृत्तसेवा

NMC News : पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी महापालिकेकडून २२० मुर्ती विक्री स्टॉलचे लिलाव करण्यात आले. त्यात तब्बल १५१ स्टॉल्सचे लिलाव प्रतिसादाअभावी तहकूब करण्यात आले. प्रतिसाद न मिळाल्याने आता प्रथम येईल त्याला स्टॉल देण्याचे धोरण अवलंबिले आहे. (NMC News Auction of 151 stalls for Ganesh idol sale postponed nashik)

दरवर्षीप्रमाणे महापालिकेने यंदाही गणेशमूर्ती विक्रेत्यांसाठी सहा विभागात २२० स्टॉल्सच्या जागा उपलब्ध करून दिल्या. त्यासाठी लिलाव जाहीर करण्यात आले. ३० ऑगस्टपासून विभागीय कार्यालयात लिलाव सुरू झाले.

पहिल्याच दिवशी स्टॉल्सचे बुकिंग होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, तीन दिवसात २२० पैकी फक्त ६९ स्टॉल्सचा लिलाव झाला. १५१ स्टॉल्सचे लिलावांना प्रतिसाद मिळाला नाही.

पश्चिम विभागात ५५ गाळे होते, त्यातील एकाही गाळ्याचा लिलाव झाला नाही. पूर्व विभागात अकरा लिलाव होते, त्यापैकी तीन लिलाव पार पडले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नाशिक रोड विभागात ९० पैकी ५०, पंचवटी विभागात चारपैकी दोन, सिडको विभागात ४२ पैकी तीन, तर सातपूर विभागात १८ पैकी तीन स्टॉल्सच्या लिलावाला प्रतिसाद मिळाला. १५१ स्टॉल्सचा लिलाव न झाल्याने प्रथम येईल, त्याला प्राधान्य देण्याचे धोरण अवलंबिले आहे.

मात्र, स्टॉल घेताना सरकारी किमतीत दहा टक्के वाढ केली जाणार आहे. मागील २७ स्टॉल्सचे लिलाव करण्यात आले होते. महापालिकेच्या स्टॉल्सला प्रतिसाद मिळाला नसला तरी खासगी जागा मोक्याच्या ठिकाणे असल्याने प्रतिसाद मिळतं आहे.

गणेशमूर्ती विक्रेत्यांना महापालिकेकडे ऑनलाईन परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर दोनच विक्रेत्यांनी नोंदणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT