NMC Nashik News esakal
नाशिक

NMC News: वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मानधनात दुप्पट वाढ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेची रुग्णालये, प्रसूतिगृहांमध्ये मानधनावर नियुक्त करण्यात आलेल्या २८ स्टाफ नर्स, चार एएनएम, दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञ व दोन मिश्रकांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्याचबरोबर मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला. (NMC News Double increase in salary of medical staff nashik)

महापालिकेच्या माध्यमातून शहरात पाच मोठे रुग्णालये, आठ प्रसूतिगृह, २९ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे चालविली जातात. आता नव्याने १०६ आरोग्य उपकेंद्रांची भर पडणार आहे.

महापालिकेत रिक्त पदे भरता येत नसल्याने मानधनावर, तसेच कंत्राटी पद्धतीने पदांची भरती केली जात आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे डॉक्टर, स्टाफ नर्स, ए.एन.एम., प्रयोगशाळा तंत्रज्ञ व मिश्रक आदी पदे मानधनावर भरण्यात आली आहेत.

महापालिकेने ४० वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मानधनावर भरती यापूर्वी केली. मानधनावरील कर्मचाऱ्यांची मुदत संपुष्टात आली.

या कर्मचाऱ्यांना ३० ऑक्टोबर २०२३ ते २६ एप्रिल २०२४ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचा, तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तांच्या निर्देशानुसार वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याच्या वैद्यकीय विभागाच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे.

स्टाफ नर्सना दरमहा १२ हजार रुपये मानधन दिले जात होते. त्यात आठ हजारांची वाढ करण्यात आली असून, त्यांना आता २० हजार रुपये मानधन मिळेल.

एनएनएमचे मानधन आठ हजार ६४० वरून १८ हजार रुपये, मिश्रकांचे मानधन दहा हजारांवरून १७ हजार, प्रयोगशाळा तंत्रज्ञांचे मानधन आठ हजार ४०० वरून १७ हजार करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND T20I: अन् सूर्याच्या टीम इंडियानं राष्ट्रगीताचा अपमान होऊ दिला नाही; साऊंड बंद झाला, पण...

Trending News: अरे ये कैसा हुआ रे बाबा ! नवरा-बायकोचं भांडण अन् रेल्वेला लागला तीन कोटींचा चुना

SA vs IND: मार्करमने जिंकला टॉस! T20I वर्ल्ड कप फायनलनंतर पुन्हा एकदा भारत-दक्षिण आफ्रिका आमने-सामने

Cannabis Farm in Dhule: धुळ्यात सव्वा दोन एकरात गांजाची लागवड, सहा कोटींचा माल... भयानक शेती पाहून पोलीसही चक्रावले

Pune Crime : मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामूहिक अत्याचार

SCROLL FOR NEXT