NMC News : ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ दिसण्याकरिता महापालिकेकडून आता रस्ते दुभाजक रस्त्यावर उभारण्यात येणारे विद्युत पोल, वाहतूक बेट व रस्त्याच्या कडेला व मधोमध लावण्यात येणारी झाडे यामध्ये एक समानता असण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या आहेत. (NMC News Standard Pattern for beautification of main squares in city Planning orders by nmc commissioner pulkundwar nashik news)
शहरात जवळपास साडेतीन हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर स्थानिक नगरसेवकांच्या मर्जीने विद्युत पोल व दुभाजक लावले जातात. दुभाजकांवर नगरसेवक सांगतील, त्याचप्रकारे रंग लावले जातात.
वृक्षारोपणात असाच प्रकार होतो. त्यामुळे नजरेसमोर एकसमानता दिसत नाही. यातून शहराला बकालपणा आल्याचे दिसून येते. त्यामुळे शहरातील सर्व मुख्य चौकांचे सौंदर्यीकरण करण्यासाठी एक स्टॅण्डर्ड पॅटर्न तयार करून त्यानुसार चौकांचे सुशोभीकरण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला आयुक्तांनी दिल्या आहेत.
चौकांचे सुशोभीकरण करताना सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून अधिकाअधिक सुशोभीकरण करावे, अशा सूचना देण्यात आल्या. शहरातील सर्व रस्त्यांवरील रस्ता दुभाजक, स्ट्रीट लाइट आदींची डिझाईन करून घ्यावे. जेणेकरून संपूर्ण शहरांमध्ये एकसमानता दिसून येईल.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
त्याचबरोबर रस्त्यांच्या बाजूला व खुल्या जागांमध्ये वृक्षारोपण करताना एकच प्रकारच्या प्रजातींची झाडे लावावी, जेणेकरून एकसमानता राहील शहरातील वाहतुकीचे सिग्नल तसेच चौकातील फॅनिंगमध्येदेखील एकसमानता राहावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने स्टॅण्डर्ड पॅटर्न तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
रस्ता दुरुस्तीला अल्टिमेटम
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्ती कामांची विविध प्रक्रिया राबवून १५ मेपर्यंत कार्यारंभ आदेश द्यावे. ३० मेपर्यंत एमएनजीएल, पाणीपुरवठा तसेच मलवाहिका, विद्युत, टेलिफोन, केबल यासाठी तोडण्यात आलेल्या डांबरी रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.
पावसाळ्याच्या कालावधीमध्ये रस्ता तोडण्याची परवानगी देऊ नये. तसेच झाल्यास कारवाई करण्याचा इशारा डॉ. पुलकुंडवार यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.