Nashik NMC News : जागतिक आरोग्य दिनानिमित्त महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शुक्रवार (ता. ७) पासून ‘सुंदर माझा दवाखाना’ उपक्रम राबविला जाणार आहे. आठ दिवस उपक्रम चालेल. उपक्रमात शहरातील सामाजिक संस्था, नागरिकांना सहभागी केले जाणार आहे. (NMC News Sunder Maja Dawakhana initiative by Municipal Corporation nashik news)
‘सर्वांना आरोग्य समता, आरोग्य सुविधा’ या संकल्पनेवर आधारित आरोग्य दिन साजरा केला जाणार आहे. त्याअनुषंगाने महापालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी सामुदायिक आरोग्य केंद्रात हा उपक्रम ७ ते १४ एप्रिल कालावधीत राबविला जाणार आहे.
सर्वांना समान आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत, अधिकाधिक लोकांनी सार्वजनिक रुग्णालयांच्या सुविधांचा वापर केला पाहिजे. याबाबत या उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती निर्माण केली जाणार आहे.
उपक्रमामध्ये आरोग्य संस्था आणि भोवतालच्या परिसरात स्वच्छता ठेवायची आहे. आरोग्य विषयी जनजागृती, गरोदरपणात घ्यावयाची काळजी, बाळाचे लसीकरणाचे महत्त्व, आहार तसेच आरोग्य केंद्रात दिल्या जाणाऱ्या विविध सेवांबद्दलची माहिती जिंगल्स, प्रशिक्षण, प्रदर्शन अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून दिली जाणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.