NMC Heatstroke Plan : उष्माघातामुळे खारघर येथे घडलेली दुर्दैवी घटना व देशातील आठ राज्यांना उष्णतेच्या लाटेचा दिलेला इशारा या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका ‘ॲक्शन मोड’ मध्ये आली आहे.
शहरातील महापालिकेच्या चार रुग्णालयांमध्ये प्रत्येकी पाच खाटा उष्माघाताच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. (NMC on action mode due to fear of heat stroke 20 beds reserved in government hospitals nashik news)
चार दिवसापूर्वी खारघर येथे एका कार्यक्रमात उष्माघाताने श्री सदस्यांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर देशातील अनेक राज्यात तापमानाने उच्चांक गाठल्याने भारतीय हवामान शास्त्र विभागाने देशातील आठ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
पश्चिम बंगाल, दिल्ली, बिहार, त्रिपुरा, मेघालय, ओडिसा या राज्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उन्हाळा कडक राहील व ‘अल निनो’ वादळामुळे यंदा पावसाळा लांबण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.
एकंदरीत तापमानाचा पारा यंदा अधिकच वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका ‘ॲक्शन मोड’ मध्ये आली आहे. नाशिक रोड येथील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय, कथडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, पंचवटी येथील इंदिरा गांधी रुग्णालय व सिडको येथील स्वामी समर्थ रुग्णालयात प्रत्येकी पाच याप्रमाणे उष्माघाताच्या रुग्णांसाठी २० खाटा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अशी माहिती सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे यांनी दिली. उष्माघाताचा रुग्ण आढळून आल्यास तत्काळ महापालिकेच्या रुग्णालयात पाठवावा. नाशिक महानगरपालिकेच्या जेडीसी बिटको रुग्णालय, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, पंचवटी विभागातील इंदिरा गांधी रुग्णालय, मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात रुग्णांकरिता व्यवस्था करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
येथे राहावे लागणार अधिक सावधान
औद्योगिक वसाहती मधील कारखान्यांमध्ये बॉयलर रूम आहे. त्या रूम मध्ये काम करणाऱ्या कामगारांना अधिक सावधगिरी बाळगावी लागणार आहे. त्याचबरोबर काच कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना देखील अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
दोन्ही ठिकाणी बाहेरील वातावरणासह खोल्यांमधील तापमानात देखील वाढ होत असल्याने तेथे काम करणाऱ्या कामगारांना अधिक धोका आहे.
उष्माघात होण्याची कारणे
- उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे.
- जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे.
- घट्ट कपड्यांचा वापर करणे.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
उष्माघाताची लक्षणे
- थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्ध अवस्था.
प्रतिबंधक उपाय
- वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची काम करणे टाळावे.
- कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावे.
- उष्णता शोषून घेणारे कपडे वापरू नये.
- काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये.
- जलसंजीवनीचा वापर करावा पाणी भरपूर प्यावे
- सरबत प्यावे
- अधून मधून उन्हामध्ये काम करणे टाळावे व सावलीत विश्रांती घ्यावी
- उन्हात बाहेर जाताना गॉगल्स डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे याचा वापर करावा
उष्माघातावर उपचार
- रुग्णास हवेशीर वातावरणात ठेवावे, खोलीत पंखे कुलर ठेवावेत, वातानुकूलित खोलीत ठेवावे.
- रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे.
- रुग्णाला बर्फाच्या पाण्याने अंघोळ घालावी.
- रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या. आईस पॅक लावावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.