NMC News : एखाद्या ठेक्याची मुदत संपण्यापूर्वी तीन महिने अगोदर नव्या निविदा प्रक्रिया राबवून वेळेच्या आत नियमाप्रमाणे काम देणे अपेक्षित असताना जुन्याच ठेक्याला किंवा ठेकेदाराला मुदतवाढ देण्याच्या फंड्याला प्रभारी आयुक्तांनी ब्रेक लावताना मुदतवाढीचे प्रस्ताव सादर न करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
महापालिकेमध्ये गेल्या काही वर्षात जुन्या कामांना मुदतवाढ देण्याची प्रथा पडली आहे. यामध्ये संबंधित अधिकारी व ठेकेदारांचे संगनमत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. (NMNMC pest control Contract extension fund break Instructions to Commissioner in Charge not to submit proposal nashik)
पेस्ट कंट्रोलचा ठेका त्यापैकीच एक. जवळपास दोन वर्षांपासून सातत्याने पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदाराला मुदतवाढ दिली जात आहे. एवढेच काय नव्याने राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेलादेखील संबंधित ठेकेदाराने न्यायालयातून स्थगिती आणल्याचा प्रकार महापालिकेत पाहायला मिळाला.
बऱ्याच ठिकाणी संदर्भातदेखील तहान लागल्यावर झरा उपसण्याची प्रथा महापालिकेत पडली आहे. नियमानुसार एखादे काम पूर्ण होत असेल, तर ते काम नव्याने देण्यासाठी तीन महिन्यापूर्वीच निविदा प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे.
जेणेकरून काम पूर्ण होण्याच्या काही दिवस अगोदरच नवीन ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेत नियमितपणे कार्यारंभ आदेश दिले जात नाही. बांधकाम विभाग व आरोग्य विभागाच्या संदर्भात विशेष करून अधिक तक्रारी आहे.
कामांची मुदत संपुष्टात येऊनही नियमित प्रक्रिया राबविली जात नसल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होते. त्याशिवाय नागरिकांनादेखील सेवा पुरविण्यात अडथळे येतात. मुदतवाढ देण्याच्या अशा फंड्यांना प्रभारी आयुक्त भाग्यश्री बाणाईत यांनी ब्रेक लावला आहे.
या संदर्भात वैद्यकीय व आरोग्य, मुख्य अग्निशमन विभागाला पत्र देत मुदतवाढीचे प्रस्ताव सादर न करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. या विभागांच्या कामांची मुदत संपल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविली जाते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या दरम्यानच्या कालावधीमध्ये जुन्या ठेकेदाराकडून विनामान्यता काम करून घेतले जाते. त्यामुळे ज्या कामांची मदत संपणार आहे. अशा कामे किंवा सेवांची निविदा प्रक्रिया मुदत संपण्यापूर्वी तीन महिने अगोदर सुरू करून जुन्या कामाची मदत संपण्यापूर्वी कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही करावी.
अशा प्रकारच्या कुठल्याही मुदतवाढीच्या नस्ती सादर करू नये, अशा स्पष्ट सूचना बानाईत यांनी दिल्या.
कार्योत्तर मंजुरी बंधनकारक
कुठलीही कामे करताना कार्योत्तर मान्यता गरजेची असते. परंतु, कार्योत्तर मान्यता न घेताच कामे सुरू असतात.
कार्योत्तर मंजुरीचे प्रस्ताव स्थायी समिती व महासभेवर सादर झाल्यानंतर स्पष्टीकरण दिले जाते. त्यामुळे मंजुरी न घेता काम सुरू केल्याचे आढळल्यास कार्योत्तर मंजुरी दिली जाणार नसल्याचे बानाईत यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.