Students handling the computer on the first day esakal
नाशिक

NMC School Opening: पहिल्याच दिवशी सेवेत ‘स्मार्ट’ क्लासरूम! 68 शाळांमध्ये प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा

NMC School Opening : महापालिका शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थीदेखील तंत्रज्ञानाने प्रगत असावा या हेतूने स्मार्टसिटी कंपनीकडून गेल्या वर्षभरापासून हाती घेण्यात आलेल्या स्मार्ट स्कूल प्रकल्पाला आज मूर्तस्वरूप प्राप्त झाले.

काठे गल्लीतील शाळा क्रमांक ४३ मध्ये विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी स्मार्ट क्लासरूममध्ये शिकण्याची संधी मिळाली. या क्लासचा विद्यार्थ्यांनी या वेळी आनंद लुटला. (NMC School Opening Smart classroom in service on first day Project in 68 schools nashik news)

मनपा शाळा ४३ मध्ये विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना शिक्षक

महापालिकेकडून स्मार्ट स्कूल हा महत्त्वाचा प्रकल्प राबविला जात आहे. नाशिक स्मार्टसिटीच्या माध्यमातून ६९ शाळांचे ६५६ वर्ग डिजिटलाईज होणार आहे.

ऑगस्ट अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. स्मार्ट स्कूल या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिकेच्या शाळांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

काठे गल्लीतील शाळा ४३ मध्ये आजपासून सुरू झालेला ई- क्लास हा त्याचाच एक भाग आहे. पहिल्या दिवशी मुलांनी वर्गात बसून ई- क्लासचा आनंद लुटला.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, डेट संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता शिवाजी आवटी, विषय तज्ञ प्रल्हाद हंकारे या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

स्मार्ट स्कूलमधील सुविधा

ई- क्लास रूममध्ये पारंपारिक फळ्यासोबतच स्मार्ट बोर्ड, नवीन बाकडी, इंटरनेट कनेक्शन, डिजिटल अभ्यासक्रमाची शैक्षणिक सुविधा आहे. संपूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. क्लासचे नव्याने रंगकाम करण्यात आले आहे.

याव्यतिरिक्त शाळेत २१ संगणकांचा एक कक्ष विकसित करण्यात आला आहे. उर्वरित ६८ शाळांमध्ये याच धर्तीवर काम प्रगतिपथावर सुरू आहे. ऑगस्टअखेर संपूर्ण शाळांमध्ये प्रकल्प कार्यान्वित होईल.

ढोलताशे औक्षण, गुलाबपुष्प

महापालिका शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी मुख्याध्यापक केंद्रप्रमुख व शिक्षकांना मार्गदर्शन केले.

विविध शाळांमध्ये पहिली व इतर वर्गातील मुलांचे औक्षण करून फुले व खाऊचे वाटप करण्यात आले. महापालिका शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात आले.

मिशन ऍडमिशन अंतर्गत जून महिन्यात अखेरपर्यंत शाळा प्रवेशाची टक्केवारी वाढविली जाणार आहे. प्रत्येक वर्गात किमान ५० विद्यार्थी पटसंख्या असावी, असे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

पन्नास हजार विद्यार्थी

महापालिकेच्या ८८ प्राथमिक व माध्यमिक १२ अशा एकूण १०० शाळा आहेत. सुमारे २९ हजार विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. ही मोहीम यशस्वीपणे राबवून पटसंख्या ५०,००० पर्यंत येण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये एकूण ८९६ शिक्षक असून, प्राथमिक विभागाचे ८३८, तर माध्यमिक विभागाचे ५८ शिक्षक कार्यरत आहे.

बहुतांश शाळांमध्ये मोफत गणवेशाचे आणि पुस्तक वाटपाचे काम सुरू असल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेश घालण्याची वेळ आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FM Souza: हायकोर्टाने सांगितला कला आणि अश्लीलतेतील फरक; 'लव्हर्स' अन् 'न्यूड' कलाकृती नष्ट करण्यास दिला नकार

Diwali 2024 Reels and Video: 'दिन दिन दिवाळी..' फोटो अन् व्हिडिओसाठी वापरा 'हे' ट्रेंडी कॅप्शन इंस्टाग्रामवर पोस्ट करताच लाईक्स, व्हियूजचा होईल वर्षाव

Jalgaon Crime News : शाळकरी मुलीचे व्हिडिओ व्हायरल करून ‘ब्लॅकमेलिंग’! दोन संशयितांना अटक; मोबाईल जप्त

'शंभूराज देसाईंचा पराभव हेच उद्धव ठाकरेंचं ध्येय'; पाटणमध्ये तिरंगी लढत शक्य? सत्यजित पाटणकर कोणती भूमिका घेणार?

'इंद्रायणी' मालिकेतील अभिनेत्याचा मोठा गौरव; इंदूच्या दत्तोबांची थेट राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी, पोस्ट शेअर करत म्हणाला-

SCROLL FOR NEXT