NMC School Uniform : नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात होऊन सुमारे पंधरा दिवस उलटले असताना, अद्यापही महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा कायम आहे.
सुमारे २७ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेले नसून, लेखा विभागाच्या मंजुरीनंतरच गणेश प्राप्त होऊ शकणार आहेत. (NMC School Students waiting for school uniform Time taken due to decision of Accounts Department nashik)
शाळा सुरु झाल्यावर पुस्तकासोबत गणवेश वाटप होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागते आहे. महापालिका शाळांतील २७ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय गणवेश दिले जाणे अपेक्षित होते.
त्यासाठी शासन स्तरावरून १ कोटीहून अधिक तर महापालिकेच्या स्तरावर एक कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात केलेली आहे.
असे असले तरी गणवेश खरेदीची फाइल सध्या लेखाविभागाच्या स्तरावर प्रलंबित आहे. याबाबत पुढील आठवड्यात मंजुरीच प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सांगितले जाते आहे. यानंतरच विद्यार्थ्यांना गणवेश मिळू शकणार आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
महापालिका शाळेतील पहिली ते आठवीतील अनुसूचित जाती, जमाती आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जाणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश दिले जाणार असले तरी सध्या त्यांना प्रतीक्षा करावी लागते आहे.
महापालिकेच्या लेखा विभागाने मंजुरी दिल्यानंतर पुढे आणखी मोठा प्रवास पूर्ण करावा लागणार आहे. अतिरिक्त आयुक्तांच्या स्तरावर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढे विद्यार्थी संख्येनुसार निधी शालेय व्यवस्थापन समितीस प्रदान केला जाईल.
या समितीकडून गणवेशाच्या कामाची निश्चिती केली जाणार आहे. सध्या तरी विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशात शाळेमध्ये हजेरी लावावी लागत असल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.