नाशिक : मार्चअखेर करवसुलीचे उद्दिष्ट शंभर टक्के गाठताना आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बड्या थकबाकीदारांविरुद्ध १ फेब्रुवारीपासून मोहीम आखली जाणार आहे.
त्यासाठी पहिल्या टप्प्यात शंभर मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. (NMC Tax Recovery Campaign against heavy defaulters from February 1 nashik)
२०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी घरपट्टी वसुलीचे २२५ कोटी, तर पाणीपट्टीचे ७५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. घरपट्टी वसुलीत मागील वर्षाच्या तुलनेत १९.८७ कोटी रुपये अधिकची वसुली झाली.
१ एप्रिल २०२३ ते ९ जानेवारी २०२४ या दरम्यान एकूण १६२ कोटी रुपयांची घरपट्टी वसुल झाली. पाणीपट्टी वसुली मात्र अपेक्षित झाली नाही. ९ महिन्यात फक्त ३४.३२ कोटी रुपये पाणीपट्टी वसुली झाली.
मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत पाणीपट्टी वसुलीत २.४८ कोटी रुपयांची घट झाली आहे. चालु वर्षात करासह घरपट्टीची थकबाकी ४८८ कोटी, तर पाणीपट्टी थकबाकी ११९ कोटी रुपये आहे.
त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी कर विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याला ३०० थकबाकीदारांकडील वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले. मराठा समाजाच्या मागासलेपणा सर्वेक्षणात करवसुली विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आल्याने करवसुलीवर परिणाम झाला आहे.
मागील आठ दिवसापासून सर्वेक्षण सुरु आहे. या आठ दिवसात अवघे २.१६ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. २१ जानेवारीपर्यंत महापालिकेच्या करवसुली विभागाकडून १६० कोटी रुपये वसुल झाले होते.
थकबाकीदार रडारवर
३१ जानेवारीला सर्वेक्षण प्रक्रिया संपणार आहे. त्यानंतर मोठ्या शंभर थकबाकीदारांवर कारवाई केली जाणार आहे. थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून त्यांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या जाणार आहे.
१०० मोठ्या थकबाकीदारांकडे महापालिकेची सुमारे २० कोटींपेक्षाही अधिक घरपट्टी थकलेली आहे. ३१ जानेवारीअखेर सर्वेक्षणाची प्रक्रिया संपुष्टात आल्यानंतर एक फेब्रुवारीपासून थकबाकीदारांविरोधात जप्ती मोहीम सुरू केली जाणार असल्याचे कर उपायुक्त श्रीकांत पवार यांनी माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.