NMC Tax Recovery : जूनअखेर कर सवलतीची मुदत संपुष्टात येत असल्याने जुलैपासून मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याअनुषंगाने महापालिकेच्या वतीने संकेतस्थळावर यादी जाहीर करण्यात आली असून, त्यात अकरा मिळकतधारकांकडे १ कोटींहून अधिक घरपट्टीची रक्कम थकीत आहे.
तर ५० लाख रुपयांपेक्षा अधिक घरपट्टी थकीत असलेले ४१ मालमत्ताधारक आहे. (NMC Tax Recovery List of big defaulters published on website 11 people owe more than one crore nashik news)
महापालिकेकडून नवीन आर्थिक वर्षात एप्रिल, मे व जून या तीन महिन्यासाठी कर सवलत योजना जाहीर करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात आगाऊ घरपट्टीची रक्कम अदा केल्यास आठ टक्के, तर मे महिन्यात सहा टक्के व जून महिन्यात तीन टक्के सवलत देण्यात आली आहे.
सध्या जून अखेरपर्यंत सवलत योजना सुरू राहणार आहे. त्यानंतर मात्र जुलै महिन्यात थकित घरपट्टीची वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने महापालिकेकडून थकबाकीदारांची यादी काढण्यात आली.
त्यात अकरा थकबाकीदार असे आहेत की, ज्यांच्याकडे एक कोटी रुपयांतून अधिक रक्कम थकीत आहे. ५० लाख रुपयांपेक्षा अधिक घरपट्टी थकीत असलेले ४१, तर दहा लाख रुपयांपेक्षा अधिक घरपट्टी थकीत असलेले २८० मालमत्ताधारक आहे.
१ लाख रुपयांपेक्षा अधिक थकीत रक्कम असलेले मिळकतधारक सर्वाधिक आहे, ती संख्या ३,२९३ इतकी आहे. १ कोटींहून अधिक रक्कम थकीत असलेल्या मालमत्ता धारकांमध्ये पाच शासकीय कार्यालयांचादेखील समावेश आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
भारत प्रतिभूती मुद्रणालय, करन्सी नोट प्रेस, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय, आयकर आयुक्त कार्यालय, बीएसएनएल या पाच शासकीय कार्यालयांचा समावेश आहे. दरम्यान, जुलै महिन्यापासून मोठ्या थकबाकीदारांवर वसुलीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती विविध कर विभागाचे उपायुक्त श्रीकांत पवार यांनी दिली.
विभाग १ लाखांपेक्षा आधिक १० लाखांपुढील ५० लाखांपुढील एक कोटींपुढील
सातपूर १८९ १६ ३ २
पश्चिम ५०२ ५२ ७ २
पूर्व १२०५ ६० १० १
पंचवटी ७२१ ८५ १२ १
सिडको ३०४ २७ २ २
नाशिक रोड ३७२ ४० ७ ३
-----------------------------------------------------------------------------
एकूण ३२९३ २८० ४१ ११
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.