NMC Water Tax esakal
नाशिक

NMC Tax Recovery : नाशिक शहरातील 44 हजार थकबाकीदारांना नोटिसा

पाणीपट्टीची थकीत वसुली करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील ४४ हजार ३८५ थकबाकीदारांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पाणीपट्टीची थकीत वसुली करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील ४४ हजार ३८५ थकबाकीदारांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.

आठ दिवसात थकबाकी न भरल्यास नळजोडणी खंडित केली जाणार आहे. (NMC Tax Recovery Notice to 44 thousand 2 water bill defaulters in Nashik city)

जीएसटी पाठोपाठ नाशिक महापालिकेला घर व पाणीपट्टीच्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त होते. पाणीपुरवठा ना नफा व ना तोटा या तत्त्वावर चालविला जातो. त्यामुळे याचे उत्पन्नाचा भाग नाही. मात्र असे असले तरी किमान खर्च भागविणे गरजेचे आहे.

परिणामी महापालिका क्षेत्रामध्ये पाणीपट्टीची पुरेशी वसुली होत नाही. घरपट्टीतून यंदा १६६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. परंतु पाणीपट्टीतून मात्र अपेक्षित अशी वसुली झाली नाही. जेमतेम ३८ कोटी रुपये पाणीपट्टीच्या माध्यमातून प्राप्त झाले.

मागील वर्षाच्या तुलनेत तीन कोटींची पाणीपट्टीत घट आहे. पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यापूर्वी महापालिकेच्या विविध विभागाने पाणीपट्टीची वसुली करण्यासाठी कंबर कसली आहे.

सर्वप्रथम थकबाकीदारांविरोधात मोहीम आखण्यात आली आहे. शहरात २ लाख ७ हजार नळ जोडणी धारक आहे. त्यातील ४४ हजार ३८५ नळजोडणी धारकांकडे ९५ कोटी ७५ लाख रुपयांची पाणीपट्टी थकली आहे.

अनेकदा सूचना देऊनही थकबाकी वसुली होत नसल्याने आता नोटिसा बजावण्यात आल्या असून, सात दिवसात थकबाकी रक्कम भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. अन्यथा नळजोडणी खंडित केल्या जाणार आहे, अशी माहिती कर उपायुक्त श्रीकांत पवार यांनी दिली.

पाणीपट्टीचे विभागनिहाय थकबाकीदार व थकबाकी

विभाग थकबाकीदारांची संख्या थकबाकीची रक्कम(कोटीत)

सातपूर ७,४८६ १४.६७

पंचवटी १२,१४४ २३.७५

सिडको ७,७१३ १४.६४

नाशिक रोड ६,९०४ १७.३५

पश्चिम १६२० ६.९०

पूर्व ८,५१८ १८.४२

एकूण ४४,३८५ ९५.७५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui murder case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्यानंतरही 'त्याचं' समाधान झालं नव्हतं; चक्क लीलावतीमध्ये...

Nagpur Accident: काॅंग्रेस नेते नितीन राऊत अपघातात बालंबाल बचावले, कारला ट्रकने धडक दिली अन्....

Mumbai Crime: गोराई बीचवरील हत्येचा उलगडा; मृतदेहाचे केले होते सात तुकडे, हातावरील टॅटूमुळे पटली ओळख

Children's Day Special Recipe: बालदिनानिमित्त मुलांसाठी बनवा चवदार रोटी पिझ्झा, सोपी आहे रेसिपी

Mumbai Police : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; रायचूरमधून गीतकाराला अटक

SCROLL FOR NEXT