NMC Water Management : जिल्हाधिकारी कार्यालयास महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत पाणीकपातीसंदर्भात निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. धरण साठ्याचा आढावा घेऊन महिन्याभरानंतर पाणी कपाती संदर्भात निर्णय घेतला जाईल असे स्पष्टीकरण देण्यात आले. (NMC Water Management Decision on water cut after month Nashik)
नाशिक व नगरच्या धरणांमधून ८.६ टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक व नगरमधून काही प्रमाणात पाणीदेखील गेले. जायकवाडीसाठी पाणी सोडताना २.८ पाणी वहन तूट म्हणून गृहीत धरण्यात आले होते.
त्यामुळे ८.६ पैकी ४.५ ते ५ टीएमसी पाणी जायकवाडीला पोचेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. यादरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने पाण्याची वाहन तूट कमी झाली. त्यामुळे विसर्ग कमी करण्याची मागणी करण्यात आली होती.
गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने फेरनियोजन करत आदेश दिल्यानंतर चारशे दशलक्ष घनफूट पाण्याची बचत झाल्याचा दावा करण्यात आला त्यामुळे पाणीकपातसंदर्भात जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर व जलसंपदा अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक झाली.
यात गंगापूर धरणातून ४ हजार ४००, मुकणे धरणातून १६००, दारणा धरणातून शंभर प्रमाणे ६ हजार १०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी नोंदविण्यात आली होती. शहराची पाण्याची प्रत्यक्षात असलेली गरज व उपलब्ध होणारे आरक्षण यात ४१३ दशलक्ष घनफुटाची तफावत आहे.
त्यामुळे जायकवाडीच्या विसर्गातून बचत झालेले चारशे दशलक्ष घनफूट पाणी महापालिकेला मिळाल्यास कपात दूर होणार आहे, याप्रमाणे बाजू मांडण्यात आली.
त्यानंतर पाणीकपातीचा प्रस्ताव बाजूला ठेवण्यात आला असून, एका महिन्यानंतर धरण साठ्याचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.