gangapur dam esakal
नाशिक

NMC Water Management: नाशिककरांवर पाणीकपातीची टांगती तलवार! 8 दिवसात समाधानकारक पाऊस न पडल्यास प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

NMC Water Management : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणा व मुकणे धरणाच्या पर्जन्यप्रवण क्षेत्रात हवा तसा पाऊस पडत नसल्याने धरण साठ्यात वाढ होत नाही. त्यामुळे नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत धरणांमध्ये सरासरी दहा ते बारा टक्के घट आहे. पुढील आठ दिवसात समाधानकारक पाऊस न पडल्यास आयुक्तांकडे पाणीकपातीचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाकडून ठेवला जाणार आहे. (NMC Water Management water crisis Proposal if no satisfactory rainfall within 8 days nashik)

भारतीय हवामान विभागाने दक्षिण पॅसिफिक समुद्रात ‘अल निनो’ वादळाचा अंदाज वर्तविल्याने देशातील मॉन्सून पर्जन्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात होती.

हवामान खात्याच्या सूचनेनुसार राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना सुचविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार महापालिकेने एप्रिल महिन्यापासून पाणी कपातीचे नियोजन केले होते.

मे महिन्यात आढावा घेऊन आठ दिवसातून दोनदा, तर त्यानंतर टप्प्याटप्प्याने कपातीचे नियोजन केले होते.

परंतु धरणात पुरेसा पाणी साठा त्याचबरोबर एकलहरे थर्मल पॉवर स्टेशन, औद्योगिक वसाहतीसाठी राखीव असलेले पाणी व जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिका हद्दीतील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन गंगापूर धरणात ठेवलेले वाढीव आरक्षणामुळे शेवटपर्यंत पाणीकपात झाली नाही.

परंतु पावसाला सुरवात झाली असली तरी धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस पडतं नसल्याने धरणांची पाणी पातळी हवी तशी वाढतं नाही. रविवारपर्यंत तुरळक पाऊस होता.

सोमवारी मात्र पावसाने ओढ दिल्याचे वातावरण निर्माण झाले. हिचं परिस्थिती पुढील आठ दिवस कायम राहिल्यास पावसाळ्यात नाशिककरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार कायम राहणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मागील वर्षाच्या तुलनेत कमी साठा

मागील वर्षी दारणा धरणात ४७०१ दशलक्ष घनफूट पाणी साठा होता. या वर्षी आतापर्यंत चार हजार ३१३ दशलक्ष घनफूट पाणी साठा आहे. गंगापूर धरणात सध्या २२६४ दशलक्ष घनफूट पाणी साठा आहे.

मागील वर्षी १७ जुलैपर्यंत ३४९७ दशलक्ष घनफूट पाणी साठा होता. मुकणे धरणात सध्या ३७५९ दशलक्ष घनफूट पाणी साठा आहे. मागील वर्षी पाच हजार ७४३ दशलक्ष घनफूट पाणी साठा होता.

धरणाची सद्यःस्थिती (१७ जुलै २०२३ पर्यंत दशलक्ष घनफूटामध्ये)

धरण चालु वर्षाचा साठा मागील वर्षाचा साठा

दारणा ४३१३ (६० टक्के) ४७०१ (६५.७६)
गंगापूर २२६४ (४०.२१ टक्के) ३४९७ (६२.११)
मुकणे ३७५९ (५१.९३ टक्के) ५७४३ (७९.३३)

"शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत पाणी तूट आहे. पुढील आठवडाभर पावसाने ओढ दिल्यास पाणी कपातीचा प्रस्ताव आयुक्तांसमोर सादर करू. त्यांच्या सूचनेनुसार नियोजन केले जाईल."

- उदय धर्माधिकारी, अधिक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT