Nashik News : इंधन कंपनीमुळे समृद्ध झालेल्या पानेवाडी (ता.नांदगाव) ग्रामपंचायत सरपंच उत्तम रामचंद्र पवार यांच्यावर सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव ८ विरुद्ध १ मताने मंजूर झाल्याने सरपंच पवार यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. (No confidence motion passed against Panewadi Sarpanch and Sarpanch Pawar steps down Nashik News)
मनमाड शहराजवळच असलेल्या आणि इंधन कंपन्यांकडून करापोटी भरघोस उत्पन्न मिळत असल्याने पानेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर येथील सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्यामुळे या जागेवर विजयी झालेले एकमेव सदस्य उत्तम पवार यांची सरपंच तर उपसरपंचपदी विमलताई आव्हाड यांची निवड झाली होती.
सरपंच श्री. पवार यांच्यावर मनमानी कारभाराचा ठपका ठेवत ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्याकडे हा अविश्वासदर्शक ठराव दाखल केला होता.
त्यात सरपंच पवार हे मनमानी पद्धतीने ग्रामपंचायतीचा कारभार करतात, सदस्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेत नाहीत व परस्परच निर्णय घेत असल्याचे सांगण्यात आले.
यानंतर बुधवारी (ता.२) अविश्वास ठरावासाठी मतदार घेण्यासाठी नायब तहसीलदार चेतन कोतकर यांचे अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. येथे निवडून आलेल्या सदस्यांची संख्या नऊ आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अविश्वास ठरावाच्या सभेत आठ विरुद्ध एक मताने हा ठराव मंजूर झाल्याने सरपंच पवार यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. उपसरपंच विमलताई आव्हाड यांच्यासह उर्वरित सात सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.
यावेळी सदस्य भारती बनकर, अनिता सांगळे, सुगंधाबाई गंभिरे, वैशाली आहिरे, प्रकाश काकड, सुनील काकड, योगेश कातकाडे, ग्रामसेवक दिलीप निकम, तलाठी शिरसाट उपस्थित होते.
पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व जागा त्याच्या पॅनलने जिंकल्या होत्या.
मात्र सरपंचांच्या या आडमूठेपणाच्या धोरणामुळे गावातील विकास पूर्णपणे थांबला असून विकासाला अडचण येत असल्यामुळे आपल्याला हे पाऊल उचलावे लागत असल्याचे बाळासाहेब आव्हाड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.