Nashik ZP News : जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला कळवलेल्या नियतव्ययातून जूनपर्यंत नियोजन करायचे असते. तसेच गतवर्षी खर्च केलेल्या निधीचा ताळमेळ ३० जूनपर्यंत पूर्ण करून अखर्चिक निधी जिल्हा नियोजन समितीला परत करायचा असतो.
मात्र, यंदा अद्याप गतवर्षी प्राप्त झालेल्या ४५१ कोटींच्या खर्चाचा ताळमेळ लागलेला नाही. तसेच यंदा कळवलेल्या नियतव्ययातून अद्याप नियोजनाला सुरवातही केली नसल्याचे चित्र आहे.
(no coordination and planning of zp nashik news)
जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला २०२२-२३ या आर्थिक वर्षात ४५१ कोटी रुपये नियतव्यय कळवला होता. त्यातून दायित्व वजा करता उर्वरित निधीच्या दीडपट असे ४१३ कोटींच्या निधीचे नियोजन केले. त्याचप्रमाणे २०२१-२२२ या वर्षात मंजूर केलेली कामे पूर्ण करण्याची मुदत मार्च २०२३ असताना त्या कामांना ऑक्टोबरपर्यंत स्थगिती देण्यात आली.
यामुळे ही कामे पूर्ण होणार की नाही, असे वाटत असताना जिल्हा परिषदेने मार्चअखेरीस हा निधी खर्ची पाडण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला नियतव्यय कळवला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मात्र, अद्याप ताळमेळ लागला नसल्याने जिल्हा परिषदेच्या एकही विभागाने नियतव्यायानुसार दायित्व वजा जाता नियोजनासाठी किती निधी उपलब्ध असणार आहे, याची माहिती घेतली नाही. परिणामी २०२३-२४ या आर्थिक वर्षातील कामांचे नियोजन रखडले आहे. वास्तविक, जिल्हा परिषदेने ३० जूनच्या आत ताळमेळ करून अखर्चिक निधी जिल्हा नियोजन समितीच्या खात्यात वर्ग करायचा असतो.
त्यानंतर नवीन वर्षाचे नियोजन करायचे असते. मात्र यंदा ना ताळमेळ लागला असून ना दायित्व निश्चित झालेले आहे. गतवर्षी दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेने २९ जून रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नियोजनासाठी याद्या तयार करून त्या मान्यतेसाठी ठेवल्या होत्या. यावर्षी अत्यंत धीम्या गतीने काम सुरू असल्याचे दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.