Caste Certificate esakal
नाशिक

Caste Certificate Verification : उमेदवारांनी स्वतः अर्ज भरणे क्रमप्राप्त; जात प्रमाणपत्र पडताळणी उपायुक्तांचे मत

सकाळ वृत्तसेवा

Caste Certificate Verification : सध्या ऑनलाइन प्रणालीमुळे समाजकल्याण कार्यालयातील गर्दी अनेक दिवसांपासून कमी झाली आहे. मात्र, उमेदवारांनी जात पडताळणीचा अर्ज करताना तो स्वतः भरल्यास त्यात त्रुटी राहणार नाही.

शिवाय, अर्जदारांची कामे गतिमान होतील, यासाठी उमेदवारांनी स्वतःचा अर्ज स्वतःच भरावा, असे मत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त राकेश पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. (No error will be detected if the candidates fill application form themselves Committee Deputy Commissioner opinion nashik news)

सध्या समाजकल्याण विभागाने ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित केली असून, बऱ्याच अंशी उमेदवारांची गर्दी कार्यालयात कमी झाली आहे. शिस्त आणि गुणवत्तेने सध्या कामे होत आहेत. शिवाय, ऑनलाइन प्रणाली सोयीस्कर आहे.

मात्र, अनेक वेळा सायबर कॅफे अथवा आउटसोर्सिंगद्वारे उमेदवार आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करतात. त्यामुळे नावात स्पेलिंग मिस्टेक, ई-मेल आयडीत फरक आढळून येत आहे. शिवाय, मूळ प्रमाणपत्रे बऱ्याच अंशी अपलोड केली जात नाहीत. त्यामुळे अनेकदा प्रमाणपत्रांची पडताळणी होत नाही.

अनेक लोक साक्षांकित प्रती स्कॅन करून अपलोड करतात. बऱ्याचदा त्या दिसत नाहीत. फोन नंबर, ई-मेल आयडीत बदल होतो. त्यामुळे उमेदवारांना त्रुटी असलेला मेल पोहोचत नाही. म्हणून स्वतःची परिपूर्ण माहिती अर्जात भरल्यास तो अर्ज परिपूर्ण भरला जाऊन जात पडताळणीची कामे गतिमान होऊ शकतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यासाठी उमेदवारांनी स्वतःचा अर्ज स्वतःच भरण्याची तसदी घ्यायला हवी. आजपर्यंत जवळपास ११ हजार ४७४ अर्ज समाजकल्याण जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने निकाली काढली आहेत. शिवाय, महिन्याला किमान अडीच ते तीन हजारांहून अधिक जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणे महिन्याला मार्गी लागत आहेत.

"उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रे वेबसाइटवर अपलोड करावीत. अर्ज भरताना स्पेलिंग मिस्टेक होऊ नये, याची काळजी घ्यायला हवी. शिवाय, ई-मेल आयडी आणि फोन नंबर टाकताना तो बिनचूक टाकावा. अनेकदा उमेदवारांना दिलेल्या संपर्क माध्यमांवर माहिती मिळत नाही. त्यामुळे पर्यायाने कार्यालयात चकरा माराव्या लागतात." - राकेश पाटील, उपायुक्त, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, समाजकल्याण कार्यालय, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT