NAAC esakal
नाशिक

Admission: ‘त्‍या’ महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षास प्रवेश नाही; विद्यापीठाकडून NAACच्‍या निकषांबाबत सूचना

सकाळ वृत्तसेवा

Admission : ‘नॅक’ मूल्‍यांकन, पुनर्मूल्‍यांकन प्रक्रियेत नसलेल्‍या महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश देऊ नये, अशा सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जारी केल्‍या आहेत.

परंतु, अशा अपात्र महाविद्यालयांची यादी उपलब्‍ध करुन दिलेली नसल्‍याने संभ्रम वाढला आहे. (No first year admission in colleges Notification regarding NAAC Criteria from University nashik news)

यापूर्वी विद्यापीठाने वेळोवेळी काढलेल्या पत्रांद्वारे महाविद्यालयांना नॅक मुल्‍यांकन प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. यासंदर्भातील अहवाल ‘नॅक’ला कळविण्याचेही स्‍पष्ट केले होते.

जानेवारीपासूनच सुरु असलेल्‍या या प्रक्रियेत एकदा महाविद्यालयांना मुदतवाढदेखील दिली होती. तसेच, प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रथम वर्ष पदवीचे प्रवेश रोखले जातील, अशी स्‍पष्ट ताकिदही या पत्रांच्‍या माध्यमातून दिली होती. तरीदेखील प्रक्रियेची पूर्तता न करणाऱ्या महाविद्यालयांसाठी आता ७ जूनला परिपत्रक जारी केले आहे.

कुलसचिव प्रफुल्‍ल पवार यांनी जारी केलेल्‍या या पत्रात म्‍हटले आहे, की एकदाही नॅक मूल्‍यांकन व एनबीए मानांकन न झालेल्‍या व सद्यस्‍थितीत नॅक मूल्‍यांकन व पुनर्मूल्‍यांकन, एनबीए मानांकन इनॲक्‍टिव्‍ह असलेल्‍या महाविद्यालयांनी इन्‍स्‍टिट्यूशनल इन्‍फॉरमेशन फॉर क्‍वालिटी असेसमेंट (आयआयक्‍यूए) नॅक कार्यालयास सादर करण्याबाबत कळविले होते.

परंतु, अद्याप ज्‍या महाविद्यालयांनी, मान्‍यताप्राप्त परिसंस्‍थांनी आयआयक्‍यूए सादर केलेले नाही व नॅक मुल्‍यांकन, पुर्नर्मूल्‍यांकन, एनबीए मानांकन झालेले नाही, अशा महाविद्यालयांनी यंदा प्रथम वर्षासाठी कोणत्‍याही अभ्यासक्रमास विद्यापीठाच्‍या पूर्व परवानगीशिवाय विद्यार्थी प्रवेशित करु नयेत. तसे केल्यास त्‍याची संपूर्ण जबाबदारी संस्‍था, प्राचार्य, संचालक, महाविद्यालयाची राहील.

दरम्‍यान, या पत्रानुसार कुठल्‍या महाविद्यालयांनी माहिती सादर केलेली नाही व कुठले महाविद्यालय प्रवेशासाठी अपात्र आहेत, यासंदर्भात विद्यार्थी व पालकांच्‍या हितार्थ यादी जाहीर करणे अपेक्षित होते.

परंतु, विद्यापीठाने अशी कुठलीही यादी जाहीर केलेली नसल्‍याने संभ्रम वाढला आहे. बारावीचा निकाल लागल्‍यानंतर सध्या प्रवेशासाठीची लगबग सुरु आहे. असे असताना पात्रतेसंदर्भातील संभ्रमामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो, अशी भितीदेखील व्‍यक्‍त केली जाते आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जबाबदारी ढकलून कसे चालणार?

अपात्र महाविद्यालयांनी प्रवेश दिल्‍यास संस्‍थाचालक व प्राचार्यांवर जबाबदारी थोपविण्यात आलेली आहे. अशा महाविद्यालयांनी जाणीवपूर्वक माहिती दडवून प्रवेश दिल्‍यास विद्यापीठ कारवाई करेलही; परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल त्‍याचे काय? असा प्रश्‍न पालकांकडून उपस्‍थित केला जात आहे.

सामान्‍यतः तंत्रशिक्षण संचालनालय बोगस महाविद्यालयांची यादी प्रसिद्ध करते. त्‍या धर्तीवर पुणे विद्यापीठालाही अपात्र महाविद्यालयांची यादी जाहीर करता आली असती. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये प्रवेश घेण्यासंदर्भात स्‍पष्टता आली असती, असेही पालकांचे म्हणणे आहे.

पूर्वपरवानगी कशासाठी?

‘विद्यापीठाच्‍या पूर्वपरवानगीशिवाय विद्यार्थी प्रवेशित करु नये’, या वाक्‍यासंदर्भातही संशय व्‍यक्‍त केला जात आहे. निकषांनुसार अपात्र महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे परवागी मागितलीच, तर कुठल्‍या आधारे विद्यापीठ परवानगी देईल? याचा ‘अर्थ’ काय? असा प्रश्‍नदेखील उपस्‍थित केला जात आहे.

दरम्‍यान, निषकांची पूर्तता केलेले नाशिक जिल्ह्यातील किती महाविद्यालये आहेत, हे जाणून घेण्यासाठी विद्यापीठाच्‍या उच्च पदस्‍थ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्‍यांच्‍याकडून योग्‍य तो प्रतिसाद मिळू शकला नाही. त्‍यामुळे जिल्ह्यातील किती महाविद्यालयांनी नॅकचे निकष पूर्ण केलेले नाहीत, हे गुलदस्‍त्‍यातच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT