Nashik News : काम पूर्ण केलेल्या ठेकेदारांना बिले देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधीच शिल्लक नसल्याने त्याविरोधात ठेकेदारांनी सोमवार (ता. १७)पासून तीन दिवस उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर हे ठेकेदार उपोषण करणार असून, त्यानंतर रस्त्यावरील एकही खड्डा न बुजवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. (no fund left with PWD to pay bills to contractors decided to go on hunger strike for three days from Monday nashik)
बांधकाम विभागाचे काम पूर्ण केलेल्या ठेकेदारांचे जवळपास १३ हजार कोटी रुपये देणे बाकी आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे या विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपेक्षा अधिक रकमेची कामे मंजूर करण्याचा धडाका आजही सुरू आहे.
त्यामुळे अगोदरच ठेकेदारांचे पैसे देण्यासाठी विभागाकडे निधीचा ठणठणाट असताना दुसरीकडे भरमसाट मंजुरी दिली जात आहे. ठेकेदारांना दर तीन महिन्यांनी एकूण देयक रकमेच्या केवळ पाच ते दहा टक्के रक्कम मिळते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंदणी केलेल्या सर्व ठेकेदारांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
महाराष्ट्र राज्य हॉटमिक्स कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन व इंडियन बिल्डर्स असोसिएशन या संघटनांनी सोमवार (ता. १७)पासून तीन दिवस राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ठेकेदार संपावर जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.