no helmet no petrol esakal
नाशिक

हेल्मेट नसेल तर दिवसभर उभे रहा! परवानाही होणार निलंबित

विनोद बेदरकर

नाशिक : हेल्मेटसक्तीला (no helmet no petrol) शहरभर प्रतिसाद मिळत असताना, अपवादात्मक स्थितीत काही ठिकाणी पेट्रोलपंपावर गोंधळ घालण्याचे प्रकार पुढे येत आहेत. त्यामुळे आता हेल्मेट न घालता पेट्रोलपंपावर गोंधळ घालणाऱ्यांना दुसऱ्याच दिवशी त्याच पेट्रोलपंपावर दिवसभर हेल्मेट वापरण्याचा प्रचार करायला उभे करण्याबाबत शहर पोलिस (nashik city police) विचार करीत आहेत. अद्याप याविषयी नियम झाला नसला, तरी हेल्मेटविषयी प्रबोधन करण्याचा नियम पोलिसांच्या विचाराधीन आहे.

गोंधळ कराल, तर पंपावर हेल्मेट प्रबोधन

स्वातंत्र्य दिनापासून पोलिसांनी हेल्मेटसक्ती केल्यापासून या उपक्रमाला शहरभर ठिकठिकाणी प्रतिसाद वाढत आहे. हेल्मेट घालून रांगेत पेट्रोल भरायला येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. काही जणांकडून पंपावर गोंधळ घालून मुद्दामच नियम तोडण्याचे प्रकार पुढे आले. वाहतूक नियमांच्या नेमकी उलटी कृती करीत स्वत:सोबतच इतरांच्या जिवाशी खेळताना दंडाची रक्कम तोंडावर फेकून नियम मोडायची सवय लागलेल्यांना पोलिस आणखी कडक दणका देण्याच्या विचारात आहेत. यात तात्पुरत्या स्वरूपात उसने हेल्मेट घेऊन पेट्रोल भरणारेही पोलिसांच्या रडारवर आहेत. यात थेट वाहन परवाना निलंबित करण्यात येणार आहे.

जिवाशी खेळ

रस्ते अपघातात हेल्मेटअभावी होणारे दुचारीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांनी ‘हेल्मेट नाही, तर पेट्रोल नाही’ ही मोहीम सुरू केली. या मोहिमेत पेट्रोलपंपावर दुचाकीस्वारांना हेल्मेट नसेल तर पेट्रोल दिले जात नाही. मात्र, काही दुचाकीचालक वेळ मारून नेण्यासाठी दुसऱ्याचे हेल्मेट घेतात. शहरातील काही पेट्रोलपंपांवर फंडा सध्या सुरू आहे. डोक्यात हेल्मेट असल्याने पंपचालकाला पेट्रोल द्यावे लागते. हेल्मेट कोणाचे आहे, कोणी दिले या भानगडीत कर्मचारी पडत नाही. त्यामुळे तात्पुरते हेल्मेट पुरविणारे आणि हेल्मेट घेणाऱ्यांचे फावते आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी आणखी कडक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच काही सामाजिक संस्थांनीही विविध पर्याय सुचविले आहेत. त्यावर पोलिस यंत्रणा विचार करीत आहे.

...तर दिवसभर हेल्मेट प्रचार

हेल्‍मेटसक्तीला प्रतिसाद न देता, पेट्रोलपंपावर जाऊन गोंधळ घालणारे पेट्रोल पंपचालकांना शिवीगाळ करीत, दहशत माजविणाऱ्यांबाबत पोलिस जास्त गंभीर आहेत. नियम मोडून वर दहशत केल्यास अशा सडकसख्याहऱ्यांना पोलिस दिवसभर गोंधळ घातलेल्या पेट्रोलपंपावर हेल्मेटविषयी प्रबोधन करण्यासाठी उभे करणार आहेत.

पेट्रोल घेण्यापुरता हेल्मेटचा वापर हा विचार संकुचित आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट आहे. उसनवार हेल्मेटच्या वापरामुळे कोरोनाचाही धोका आहे. त्यामुळे आता असे तात्पुरते हेल्मेट घेऊन पेट्रोल भरणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. पोलिस ठाणेनिहाय साध्या वेशातील गस्तीपथक तैनात केले जाईल. हे पथक हेल्मेट देणाऱ्या आणि घेणाऱ्यांवर लक्ष ठेवेल. त्यात दोषी आढळल्यास संबंधितांकडून बंधपत्र लिहून घेतले जाईल. तसेच तत्काळ वाहन परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. -दीपक पांडे, पोलिस आयुक्त, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT