No parking sign posted at Rajiv Gandhi Bhavan esakal
नाशिक

Nashik No Parking Boards : शहरात झळकले ‘नो-पार्किंग’चे फलक! रस्त्यालगत वाहन पार्किंगचे पांढरे पट्टे

सकाळ वृत्तसेवा

Nashik No Parking Boards : शहरात पार्किंग समस्या नेहमी वाहनचालकांसाठी नव्हे तर पोलिसांसाठीही डोकेदुखीच. दुचाकी वा चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची पुरेशी जागा नसल्याने रस्त्यालगत वाहने पार्क केली जातात.

परिणामी वाहनचालक आणि पोलिसांमध्ये वादाचे खटके उडतात. त्यामुळे वाहतूक शाखेने काही ठिकाणी नव्याने नो-पार्किंगचे फलक लावले आहेत, तर काही रस्त्यालगत दुचाकी-चारचाकी पार्किंगसाठी पांढरे पट्टे मारले आहेत.

यामुळे वाहनचालक- पोलिस यांच्यातील वाद टाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता नो-पार्किंग जागेत वा पांढऱ्या पट्ट्याच्या बाहेर वाहने पार्क करण्यात आल्या तर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. (No parking boards seen in city White strips of roadside vehicle parking nashik news)

नो-पार्किंगचा फलक नसणे, रस्त्यालगत पार्किंगसाठी पांढरे पट्टे नसणे त्यावरून वाहतूक शाखेकडून वाहनांची टोइंग वा इ- चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली असता, वादाचे खटके उडतात. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी टोइंग ठेकेदाराला मुदतवाढ दिली नाही.

इ- चलनाद्वारे दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. परंतु, इ-चलन मशिन पुरेशा प्रमाणात नसल्याने त्यालाही मर्यादा पडते. परिणामी, आयुक्तांनी पुन्हा टोइंगची नव्याने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

मात्र, असे असले तरी मूळ वादाची कारणे दूर करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी सीएसआर निधीतून शहरात ठिकठिकाणी नो-पार्किंगचे फलक आणि रस्त्यालगत पार्किंगसाठीचे पांढरे पट्टे मारले आहेत. यामुळे वाहनचालकांना नो-पार्किंगच्या जागेत वाहने आता पार्क करता येणार नाहीत.

तसेच, काही रस्त्यांवर रस्त्यालगत दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी पांढरे पट्टे मारले आहेत. काही ठिकाणी यापूर्वीही पांढरे पट्टे मारले होते, परंतु ते पुसट झाले होते. त्या ठिकाणीही पुन्हा पांढरे पट्टे नव्याने मारले आहेत. यामुळे पोलिसांकडून नो-पार्किंगच्या जागेत पार्क केलेल्या वाहनांवर आणि पांढऱ्या पट्ट्यांबाहेर वाहने पार्क केली तर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नो-पार्किंगचे फलक

* राजीव गांधी भवनसमोर

* नेहरू गार्डनसमोर

* परशुराम साईखेडकर नाट्यगृहासमोर

* कुमार शर्ट दुकानासमोर, शालिमार

* राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयासमोर, शरणपूर रोड

* बालनिरीक्षण सुधारगृहासमोर

* ठक्कर बाजार बसस्थानकाबाहेर

* राजदूत हॉटेलसमोर, त्र्यंबक रोड

* सिटी सेंटर मॉलसमोर

* पोलिस परेड मैदानाच्या भिंतीलगत

* तालुका पोलिस ठाण्याच्या भिंतीलगत

* मेळा बसस्थानक भिंतीलगत

* बालनिरीक्षक सुधारगृहाच्या भिंतीलगत

* एसबीआय बँक, शरणपूर रोड

* चाय टपरी, कॉलेज रोड

* थत्तेनगर

* मॅक्डोनल्डस्‌, कॉलेज रोड

पार्किंगसाठी पांढरे पट्टे

* शालिमार बसस्टॉप मार्ग

* शालिमार दुचाकी पार्किंग

* एम.जी. रोड चारचाकी पार्किंग

* नेहरू गार्डन दुचाकी पार्किंग

* एम.जी. रोड दुचाकी पार्किंग

* मेहेर सिग्नल दुचाकी पार्किंग

"वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. वाद होऊ नये यासाठीच नो-पार्किंगचे फलक शहरात अनेक ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. नियमांचा भंग केल्यास दंडात्मक कारवाईच्या सूचना वाहतूक शाखेला देण्यात आल्या आहेत."

- मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त, शहर वाहतूक शाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Vidhan Sabha Election: मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर जिल्ह्यात विक्रमी मतदान; 2009 च्या निवडणुकीत 60 टक्के, तर यंदा 69.12 टक्क्यांवर

आलिया कपडे बदलत असताना तो सतत तिच्यावर... इम्तियाज अली यांनी सांगितली ती घटना; म्हणाले- त्याला मी पाहिलं तेव्हा

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

Nashik Police : मतमोजणी केंद्राभोवती कडेकोट सुरक्षा तैनात; सशस्त्र आयटीबीपीची करडी नजर

IPL Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पुढील 3 हंगामाच्या तारखा BCCI ने केल्या जाहीर

SCROLL FOR NEXT