Keshav Jadhav, Rajesh Surve, Shivaji Sakhre while giving a statement along with Education Minister Deepak Kesarkar on behalf of State Intermediate Teachers Association in Mumbai. esakal
नाशिक

Deepak Kesarkar: कोणत्याही परिस्थितीत शाळांचे खाजगीकरण नाही; शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचे शिक्षक संघटनेला आश्वासन

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव शहर : राज्यातील एकही शाळा बंद केली जाणार नसून, शिक्षण क्षेत्राचे कोणत्याही परिस्थितीत खाजगीकरण होणार नाही.

एकही कंत्राटी शिक्षक नेमणूक करण्यात येणार नसल्याची ग्वाही शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकारी यांना दिले.

शाळांचे खासगीकरण न करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी मध्यवर्ती प्राथमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची मुंबईत शासकीय निवासस्थानी निवेदन देत चर्चा केली. (No privatization of schools under any circumstances Education Minister Deepak Kesarkar assurance to teachers union nashik )

जिल्हा परिषदांच्या शाळातील भौतिक सुविधा सुसज्ज करण्याच्या हेतूने शासन शाळा दत्तक योजना हा उपक्रम आणला असून दत्तक घेणाऱ्या कंपनीचा प्रशासनामध्ये कोणताही हस्तक्षेप असणार नाही.

कंपन्यांचा सीएसआर शिक्षकांना प्रशिक्षण देणे शैक्षणिक साहित्य बनवणे छोट्या छोट्या योजना राबविणे यात खर्च होत आहे. सदरचा खर्च पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येईल.

शाळांचे व्यवस्थापन, मालकी वा कोणतेही अधिकार कंपन्यांना असणार नाही. कंत्राटी शिक्षक नेमणुकीबाबत कोणतेही धोरण नसून राज्यात एकही कंत्राटी शिक्षक नेमणूक होणार नाही.

सर्व जिल्ह्यांची बिंदूनामवली तपासून पूर्ण होताच ३० हजार शिक्षण सेवक नियुक्ती केले जाऊन सेवा ३ वर्ष सेवा पूर्ण होताच शासकीय सेवेत नियमित केले जातील.

समूह शाळा योजना बाबत शासन स्तरावर फक्त माहिती संकलन केली जात आहे. वाडीवस्तीवरील शाळा बंद करण्याचे शासनाचे कोणतेही धोरण नाही.

माहिती संकलन होताच कमी अत्यल्पपटांच्या शाळांबाबत काय विचार करता येईल याबाबत पालक व शिक्षकांना विश्वासात घेतल्या शिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.

शिक्षकांमधून ५० टक्के केंद्र प्रमुख पदे परीक्षेतून भरली जाणार आहेत. विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी पदांवर प्राथमिक शिक्षकांमधून परीक्षाद्वारे भरती करण्यात यावीत याबाबत शासन सकारात्मक विचार करेल असेही यावेळी श्री केसरकर यांनी सांगितले.

राज्यातील शिक्षकांनी कोणताही गैरसमज करून न घेता विद्यार्थी व शाळा टिकवण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील.

बैठकीला राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटनेचे अध्यक्ष केशव जाधव, सरचिटणीस राजेश सुर्वे, प्रमुख संघटक प्रसाद पाटील, चिंतामण वेखंडे, सल्लागार शिवाजीराव साखरे,, सदस्य हरीश ससनकर, उत्तरेश्वर मोहोळकर, बापू खरात, लक्ष्मण दावनकर, शिवाजी ठोंबरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: “आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणीच्या खात्यात जमा होतील”; CM शिंदेंची घोषणा

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Champions Trophy 2025: झुकेगा नहीं साला... म्हणत होते, पण BCCI समोर पाकिस्तानची शरणागती, भारताचे सामने 'या' देशात

Raj Thackeray: मुल्ला मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढताहेत, राज ठाकरेंचा आरोप! पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काढला फतवा

Aditya Thackeray: सत्तेत आल्यास पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा! आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT