Nashik News : आदिवासी विकास विभागातील कामकाज कायमच कुठल्याने कुठल्या कारणांमुळे चर्चेत राहते. यात आणखी एक भर पडली असून, आदिवासी विकास आयुक्तालयांतर्गत नाशिक अप्पर आयुक्तालयातील उपायुक्त सुदर्शन नगरे यांचा वाढदिवस कार्यालयात धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
यावेळी कर्मचाऱ्यांनी साहेबांची केबिन, टेबल सर्वकाही फुलांनी सजविले होते. (notice from Commissioner Naina Gunde to Tribal Deputy Commissioner nashik news )
एवढेच नाही तर आनंदोत्सवात साहेबांची खातिरदारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयातच कोल्ड फायर लावून वाढदिवसाची रंगत वाढविली. बुधवारी (ता.१७) रात्री उशिराने साजरा करण्यात आलेला हा वाढदिवस उपायुक्त नगरे यांच्या अंगलट आला आहे. आदिवासी आयुक्त नयना गुंडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपायुक्त नगरे यांच्यासह कार्यालयातील ४० कर्मचाऱ्यांना देखील नोटीस बजावत दणका दिला आहे.
आदिवासी विभागाचे नाशिक येथे राज्याचे आयुक्तालय आहे. या कार्यालयातील कारभाराची कायमचं राज्यभर चर्चा होते. आता पुन्हा एकदा हे कार्यालय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. नाशिक अप्पर आयुक्तालयातील उपायुक्त नगरे यांचा बुधवारी वाढदिवस होता. या वाढदिवस कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अगदी धुमधडाक्यात सेलिब्रेशन केला.
एखाद्या सेलिब्रिटीच्या स्टेज शो सारखा माहोल आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात यावेळी होता. पार्टी बोअम्बरने नगरे यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. सहकाऱ्यांच्या उपस्थितीत बॉस नाव लिहिलेल्या केकचे कटिंगही यावेळी केले. ठेकेदारांच्या मदतीने हा वाढदिवस साजरा झाल्याची चर्चा होती. कल्पनेपेक्षाही जोरदार वाढदिवस साजरा झाल्याने उपायुक्त नगरे भारावून गेले.
तेवढ्यात अतिउत्साही कर्मचाऱ्यांकडून या साजरा केलेल्या वाढदिवसाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. फोटो व्हायलर झाल्यानंतर हा वाढदिवस चर्चेत आला. याबाबत उपायुक्त सुदर्शन नगरे यांनीदेखील एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा होईल याची कल्पना नसल्याचे सांगत भविष्यात सरकारी कार्यालयात या पद्धतीने कोणाचाच वाढदिवस साजरा होणार नाही, याची काळजी घेण्याचे आश्वासन दिले.
आदिवासी विभागामध्ये धुमधडाक्याने साजरा करण्यात आलेल्या या वाढदिवसाची चर्चा मात्र सर्वत्र जोरदार सुरू आहे. ज्या वेळी कार्यालयात हा वाढदिवस साजरा होत होता त्याचवेळी कार्यालयाबाहेर आदिवासींच्या एका प्रश्नावरून आंदोलन सुरू होते. त्याकडे मात्र अधिकाऱ्यांचं लक्ष गेले नसल्याचे सांगितले जात आहे. शासकीय वेळात वाढदिवस साजरा करणे हे कोणत्या नियमात बसते, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
''शासकीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांनी वाढदिवस साजरा करणे योग्य नाही. या बाबत उपायुक्तांसह विभागातील ४० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. यापुढे असे प्रकार झाल्यास थेट कारवाई केली जाईल.''- नयना गुंडे, आयुक्त, आदिवासी विकास विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.