Notice News esakal
नाशिक

Nashik News : जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा नोटीस; आदिवासी विकास सचिव, आदिवासी विकास आयुक्ताचाही समावेश

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हाधिकारी गंगाथरन. डी. यांना पुन्हा एकदा एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट आहार दिल्याप्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडून नोटीस आली आहे.

आदिवासी विकास आयुक्त संजय खंदारे आणि आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनाही आयोगाने नोटीस बजावली आहे. (notice to Collectors Tribal Development Secretary Tribal Development Commissioner also included from National Commission for Scheduled Tribes)

थेट राष्ट्रीय स्तरावर आदिवासी विकास विभागातील कामकाजाची दखल घेतली गेल्याने या विभागाचे कामकाज चव्हाट्यावर आले आहे. उभाडे (ता. इगतपुरी) भागात आदिवासी व कातकरी समााजातील वीजभट्टी, मासेमारीसह इतर कामे करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील काही अल्पवयीन मुलांची मेंढीपालनासाठी विक्री झाल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते.

यात इतपुरी आणि संगमनेर (जि. नगर) येथे गुन्हे दाखल झाले. अल्पवयीन मुलांच्या विक्री प्रकरणाची केंद्रीय जनजाती आयोगाने सुमोटो दखल घेत २ जानेवारीला समन्स बजावत नाशिक, नगरचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना ९ जानेवारीला बाजू माांडायला सांगितले होते.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

मात्र हे चारही अधिकारी फिरकलेच नाहीत. म्हणून त्यातून आयोगाने थेट राज्याच्या पोलिस महासंचालकांना पत्र संविधान अनुच्छेद ३३८ (क) नुसार चारही अधिकाऱ्यांना अटक वॉरंट काढून हजर करण्याचे आदेश दिले.

दुसरी नोटीस

हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याचा तक्रारीवरून आयोगाने पुन्हा एकदा जिल्हाधिकारी आणि आदिवासी विकास विभागाला नोटीस पाठवून विचारणा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: चंदगड मतदारसंघात शिवाजी पाटीलआघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT