कसबे सुकेणे (जि. नाशिक) : सोशल मीडियाचा (Social Media) प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढत असून तरुणाईबरोबरच आबालवृद्धांपर्यंत आता फेसबुक (Facebook) व्हाट्सअपचा (Whatsapp) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रत्यक्ष भेटून किंवा फोन करून वाढदिवस (Birthday) व लग्नाच्या वाढदिवसाच्या (Wedding Anniversary) शुभेच्छा देण्याऐवजी आता या माध्यमांचा सर्वाधिक वापर केला जात आहे. (Now birthday was being celebrated on Facebook and WhatsApp Nashik News)
सध्या व्हाट्सअपवर अनेक ग्रुप असतात. यात कोणाचा वाढदिवस असला की सर्व ग्रुपच्या सदस्यांकडून त्यांना वाढदिवसाच्या किंवा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. जणू वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा हा नवीनच ट्रेंड सुरू झाला आहे. एक मेसेज उचलून दुसरीकडे टाकला जातो. ग्रुपमध्येही आपल्याला कोण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व कोण शुभेच्छा देत नाही हे देखील ज्याचा वाढदिवस आहे त्याच्याकडून बघितले जाते. फेसबुकवरूनही जवळच्या एखादा व्यक्तीच्या वाढदिवस किंवा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जाता. अनेकदा तो वाढदिवस उलटून गेल्यानंतर त्या पाहतो. काही जण उशिरा देऊन वर बीलेटेड असा उल्लेख करतात. सोशल मीडियाच्या आधी कधी कोणाचा वाढदिवस होऊन गेला हे देखील कळत नव्हते. मात्र फेसबुकने तर उद्या कुणाचा वाढदिवस आहे हे सांगण्याची सोयही करून दिली आहे, त्यामुळे सहज लक्षात येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.