India Post esakal
नाशिक

Life Certificate in India Post : आता टपाल कार्यालयातूनही मिळणार 'जीवन प्रमाणपत्र'

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जीवन प्रमाणपत्र किंवा डिजिटल लाइफ सर्टिफिकेट आता तुमच्या जवळच्या टपाल कार्यालयातूनही उपलब्ध होणार आहे. यापुढे हे सर्टिफिकेट कोणत्याही टपाल कार्यालयासह थेट घरपोचही उपलब्ध होणार आहे. (Now Life Certificate will available from Post Office Nashik News)

पेन्शनधारकांना पेन्शन नियमित मिळण्यासाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँक किंवा पेन्शन विभाग कार्यालयात चकरा माराव्या लागतात. यात आधार प्रमाणीकरणासह डिजिटल लाइफ सर्टिफिकेट त्वरित दिले जाते. केंद्र, राज्य सरकारसह ईपीएफ किंवा अन्य कोणत्याही सरकारचे पेन्शनधारकांना नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात अद्ययावत करणे गरजेचे असते.

ही सेवा नाममात्र शुल्कात म्हणजे अवघ्या ७० रूपयांत उपलब्ध आहे. विशेष म्हणजे यात इंडिया पोस्ट बँकेच्या प्रीमिअम खातेधारकांना पन्नास टक्के सवलतही देण्यात आली आहे. या सर्टिफिकेटसाठी संबंधितांचा पेन्शन आयडी, पेन्शन पेमेंट ऑर्डर, पेन्शन खाते असलेल्या बँकेचे नाव, खाते नंबर, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर आवश्‍यक आहे.

"डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तुमच्या मोबाईलवर पाठविलेल्या पर्मनंट आयडीसह त्वरित तयार केला जाईल. त्यामुळे तुमचे प्रमाणपत्र तपशील पेन्शन विभागाकडे आपोआपच अपडेट होतील. निवृत्तिवेतनधारक पोस्ट इन्फो मोबाईल ॲप किंवा https://www.indiapost.gov.in/ वर डोअर स्टेप सेवेसाठी विनंती करू शकतात."
- मोहन अहिरराव, सिनिअर सुपरिंटेंड, टपाल विभाग, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे 46,178 मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT