Corona Updates News Nashik esakal
नाशिक

Corona Update : ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या चारशेच्‍या उंबरठ्यावर

अरूण मलाणी

नाशिक : कोरोनाबाधितांच्‍या (Corona patients) दैनंदिन वाढत्‍या संख्येसोबत सक्रिय रुग्‍ण संख्येतही सातत्‍याने वाढ सुरू आहे. हा आकडा आता चारशेच्‍या उंबरठ्यावर पोचला आहे. शनिवारी (ता.२) जिल्ह्यात ६६ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह (Positive) आले. ४७ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत १९ ने वाढ झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या ३७२ वर पोहोचली आहे. (number of active patients is on near 400 Nashik Corona update news)

शनिवारी नाशिक महापालिका क्षेत्रात ३८, नाशिक ग्रामीण भागात २१, मालेगाव महापालिका क्षेत्रात एक, जिल्‍हाबाहेरील सहा अशा एकूण ६६ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाले. सध्या सक्रिय असलेल्‍या ३७२ बाधितांपैकी २४३ बाधित नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. नाशिक ग्रामीणमधील बाधितांची संख्यादेखील शंभराहून अधिक झाली असून, १०३ बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत. मालेगाव महापालिका क्षेत्रात दहा, तर जिल्‍हाबाहेरील १६ बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत. शनिवारी जिल्ह्याचा पॉझिटिव्हि‍टी दर २.८० टक्‍के राहिला. सर्वाधिक ७.२१ टक्‍के पॉझिटिव्हिटी दर हा नाशिक महापालिका क्षेत्रातील राहिला. दरम्‍यान, सायंकाळी उशिरापर्यंत ४६६ अहवाल प्रलंबित होते. यापैकी ३१४ प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीणमधील, तर ९८ प्रलंबित अहवाल नाशिक महापालिका क्षेत्र, मालेगावच्‍या ५४ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?

'PM मोदी उठता-बसता बाळासाहेबांचं नाव घेतात आणि उद्धव ठाकरेंच्याच पाठीत खंजीर खुपसतात'; प्रियांका गांधींचा हल्ला

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Panchang 17 November: आजच्या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

Latest Maharashtra News Updates : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन

SCROLL FOR NEXT