Nashik News : मतदार यादी अद्ययावतीकरणासाठी निवडणूक विभागाने सुरू केलेल्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद असला, तरी त्यात १८ ते १९ वयोगटातील युवकांची संख्या एक टक्काही नाही. प्रशासनाने गृहीत धरलेल्या आकड्यापेक्षा जेमतेम २० टक्के युवक-युवतींनी नोंदणी केली आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा स्वतः विविध शिक्षण संस्थांमध्ये जाऊन युवकांना मतदार नोंदणीसाठी आवाहन करणार आहेत. श्री. शर्मा यांनी शुक्रवारी (ता. २७) विविध राजकीय पक्षांना तरुणांची मतदान नोंदणी वाढवी, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. (number of new voters in district is less than 1 percent nashik news)
जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत राजकीय पक्षांची बैठक झाली. सुधाकर बडगुजर (शिवसेना), अॅड. श्याम बडोदे (भारतीय जनता पक्ष), अॅड. प्रभाकर वायचळे (आम आदमी पक्ष), पवन ओबेराय (राष्ट्रवादी काँग्रेस), राजकुमार जेफ (काँग्रेस), निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार मंजूषा घाटगे आदी उपस्थित होते.
श्री. शर्मा यांनी जिल्ह्यात १८ व १९ वयाच्या तरुणांची संख्या दोन लाख ४६ हजार गृहीत धरलेली असताना अवघ्या ४४ हजार युवकांची नोंदणी झाली आहे. ४, ५ आणि २५, २६ नोव्हेंबरला जिल्ह्यात प्रत्येक मतदान केंद्रावर नोंदणी मोहीम राबविली जाईल. येत्या ९ डिसेंबरपर्यत यादी निर्दोष करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
मोठ्या शिक्षण संस्थांना स्वतः भेटी देऊन युवकांना नावनोंदणीसाठी आवाहन करणार आहेत. ऑनलाइन प्रक्रिया असल्याने युवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे. राजकीय पक्षांनी प्रत्येक बूथनिहाय कार्यकर्त्यांनी ३० हून अधिक मतदार नोंदणी फॉर्म असल्यास प्रतिज्ञापत्र द्यावे, असे सांगितले.
८९ हजार दुबार नावे
राजकीय प्रतिनिधींनी याद्यांत ९० हजार दुबार नावे काढण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घ्यावी, जिल्हा परिषदेसह शासकीय कर्मचारी, शिक्षकांच्या बदल्यांनंतर जुन्या ठिकाणचे नाव कमी न करताच नवीन नोंदणी होते. त्यात लक्ष घालावे, असे सांगितले.
मतदार नोंदणीनंतर नवीन युवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाइन पत्र देऊन गौरवावे, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार नोंदणीत सहभागी करून घ्यावे, दिव्यांगाच्या मेळाव्यातून नोंदणी घ्यावी, मृत सभासदांचे नाव काढण्यासाठी महापालिका, ग्रामपंचायतीसह जिल्हा रुग्णालयांच्या डेटा घेतला जावा आदी सूचना मांडल्या.
- देवळाली मतदारसंघात सर्वांत कमी मतदार
- पश्चिम मतदारसंघात महिलांची संख्या कमी
- प्रति हजार पुरुषांच्या तुलनेत ९१४ महिला
- १८ ते १९ वयोगटाचे एक टक्काही मतदार नाहीत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.