Water Tanker : वाढत्या उन्हाच्या कडाक्यासोबत टँकरची संख्या वाढत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ५२ गावे आणि ४० वाड्यांवरील ७६ हजार ६६ लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे.
सर्वाधीक ३४ टँकर येवला तालुक्यात सुरु आहेत. (number of tankers increased in district 76 thousand population on tanker water nashik news)
येवला, मालेगाव, इगतपुरी, बागलाण, चांदवड, देवळा, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांत पाण्याच्या टँकरची मागणी वाढत आहे. पश्चिम पट्ट्यातील जादा पावसाचे तालुकेही टंचाई स्थितीला अपवाद नाहीत.
उलट जलस्त्रोत कमी झाल्याने पश्चिम पट्ट्यातील तालुक्यांमधील गावांत टँकरची मागणी सुरु आहे. प्रशासनाने पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी आतापर्यंत ३१ विहीरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यात सर्वाधीक ११ अधिग्रहित विहीरी मालेगाव तालुक्यात आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तर, सर्वाधीक टँकर येवला तालुक्यात सुरु आहेत. येवला तालुक्यात २५ गावे आणि ९ वाड्यांवर ३१ हजार १५६ लोकसंख्येला ३८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. त्याखालोखाल मालेगाव तालुक्यात ७ गावे व ८ वाड्यांसह १५ ठिकाणी २० हजार ८५६ लोकसंख्येला १६ टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.
चांदवड तालुक्यात ७ गावांतील ११ हजार लोकसंख्येला १४ टँकरने, इगतपुरी तालुक्यात १९ ठिकाणी ७ हजार १२८ लोकसंख्येला १३ टँकरने, तर बागलाण तालुक्यात ८ गावांतील अकराशे लोकसंख्येला ११ टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.