Nashik News : शालेय पोषण आहार योजनेतंर्गत शिक्षक संघटना, पालक व विद्यार्थ्याची मागणीची दखल घेत शालेय शिक्षण विभागाने आता शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार व खिचडी व सोबतच पूरक आहार देण्याचे निश्चित केले आहे.
याकरिता नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. जून महिन्याच्या तांदळासह धान्यादी मालाचे शाळास्तरावर वितरण करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस गोड होणार आहे. (Nutritious Khichdi on first day of school Planning of Education Department Distribution of food grains including rice benefiting 29 thousand 477 students Nashik News)
जिल्ह्यातील सर्व पात्र शाळांच्या मुख्याध्यापकांना शालेय शिक्षण विभागाकडून याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
या योजनेतंर्गत इगतपुरी तालुक्यातील सर्व व्यवस्थापन व माध्यमांच्या एकूण २६९ शाळांमधील २९ हजार ४७७ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येणार असल्याचे योजनेच्या अधीक्षिका प्रतिभा बर्डे यांनी 'सकाळ'ला सांगितले.
काही दिवसांपूर्वी शालेय पोषण आहार अंतर्गत माध्यान्ह भोजन राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांना पौष्टिक खिचडी शिजवून देण्यात येत होती.
मात्र कोरोनाच्या कालावधीतील शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना दर महिन्याचा तांदूळ आणि कडधान्य असा कोरडा शिधा देण्याचा निर्णय झाला होता.
राज्यात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेली ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत असून या योजनेसाठी हजारो रुपयांचे अनुदान दिले जाते. शाळेत कोणतेही मूल कुपोषित राहू नये, विद्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी ही योजना सुरू झाली.
कोरोनापूर्वी शालेय पोषण आगारांतर्गत (माध्यान्ह भोजन) पहिली ते आठवीच्या मुलांना पौष्टिक खिचडी शिजवून देण्यात येत होती.
२०२१ मध्ये अतिरिक्त पोषणमूल्य असलेल्या 'न्यूट्रिटिव्ह स्लाइस'(स्पेशली डिझाइन प्रोटिन बिस्कीट) देण्याचा निर्णय झाला होता. आता शाळेच्या पहिल्या दिवसापासून पोषण आहार दिला जाणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आठवड्यातील आहार असा
◆सोमवार : तूरडाळ, फोडणीचे वरण, भात
◆मंगळवार : चवळी उसळ व भात
◆बुधवार : मूगदाळ खिचडी + पूरक आहार
◆गुरुवार : तूरडाळ फोडणीचे वरण व भात
◆शुक्रवार : चवळी उसळ व भात
◆शनिवार : मूगदाळ खिचडी
"येत्या १५ तारखेपासून शाळा सुरू होत आहेत. सुट्टीच्या कालावधीत मागणीप्रमाणे शाळांना पोषण आहाराचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच खिचडी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काही संभाव्य अडचणी उद्भवल्यास तत्काळ सोडविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे."
- प्रतिभा बर्डे, अधीक्षिका, शालेय पोषण आहार, इगतपुरी
"पहिल्या दिवसापासून पोषण आहाराचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तेल व इतर पूरक साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे धान्यादी मालासह तेल, मसाले व इतर पूरक साहित्यही पुरवण्यात यावे, त्याचाही विचार व्हावा."
- निवृत्ती तळपाडे, जिल्हाध्यक्ष, आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.