नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (YCMOU) बी.ए. (BA) अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्ष परीक्षेत मनुस्मृतीसंदर्भातील आणि छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांचा संबंधांविषयीच्या प्रश्नावर आक्षेप (Objection) नोंदविला आहे.
ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (एआयएसएफ) या विद्यार्थी संघटनेने आक्षेप नोंदवत निवेदन दिले आहे. गुरुवारी (ता. १४) अभ्यासक्रमाची होळी करून आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे. (Objections to questions on Manusmriti Samarth Ramdas in BA examination of YCMOU Nashik Latest Marathi News)
यासंदर्भात ‘एआयएसएफ’तर्फे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्राचा पेपर मंगळवारी (ता.१२) झाला. परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक दोनमध्ये शिवाजी महाराजांच्या राजनीतीला समर्थ रामदासांनी केलेले योगदान सांगा, असा प्रश्न विचारला आहे.
प्रश्न क्रमांक तीन (ई) मध्ये मनुस्मृती ग्रंथाचे सामाजिक महत्व स्पष्ट करा, हा प्रश्न विचारला आहे. या प्रश्नांवर आक्षेप घेत प्रागतिक विचारांचे यशवंतराव चव्हाण यांचे नाव असलेल्या मुक्त विद्यापीठात भारतीय संविधानविरोधी अभ्यासक्रमाचा समावेश केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
समर्थ रामदास व शिवाजी महाराजांबाबत औरंगाबाद खंडपीठाचा दाखला देताना विद्यापीठ अभ्यासक्रमात मनुस्मृतीसंदर्भात केलेले विवेचन घटनाविरोधी असल्याचा दावा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सातत्याने चुकीचा इतिहास सांगून बदनामी सुरू आहे.
संविधानविरोधी मनुस्मृती ग्रंथाबाबतच्या उल्लेखातून विद्यापीठामार्फत मनुस्मृतीचे उदात्तीकरण केल्याचा आरोप आहे. संविधानविरोधी मनुस्मृती तसेच शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास लिहिणारी अभ्यासक्रम समिती रद्द करावी, या अभ्यासक्रमातील इतिहासद्रोही तसेच घटनाविरोधी लिखाण तत्काळ मागे घेऊन, प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांबाबत विद्यापीठाने जाहीर माफी मागावी, अशी मागणी संघटनेतर्फे निवेदनातून केली आहे.
यासंदर्भात गुरुवारी अभ्यासक्रमाची होळी करण्याचा इशारा राज्याध्यक्ष विराज देवांग, शहराध्यक्ष जयंत विषयपुष्प, शहरसचिव प्राजक्ता कापडणे, कैवल्य चंद्रात्रे यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.