Businessmen selling flowers near the Mahatma Gandhi statue at Mosam Pul Chowk here esakal
नाशिक

Dussehra 2023 : बाजारपेठेत नवचैतन्य; दसऱ्यामुळे खरेदीला उत्साह

सकाळ वृत्तसेवा

Dussehra 2023 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर दुचाकी आणि चारचाकी खरेदीसाठी आज शहरात बुकिंगसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. सुवर्णपेढ्याही सजल्या असून कापड बाजारातही चैतन्य पसरले आहे.

दुष्काळाची छाया असली तरी दसऱ्याच्या आनंदपासून सर्वसामान्य नागरिक दूर राहू शकत नाही, त्यामुळे आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाचा खरेदीकडे कल दिसून आला. (occasion of dussehra people flocked city to buy two four wheelers nashik news )

नोकरदार वर्गातही चारचाकी अन दुचाकींची विचारणा होत होती. विशेष, म्हणजे इलेक्ट्रिक दुचाकीसाठी अधिक चौकशी दिसून आली. दुसरीकडे शहरात दसऱ्याच्या पूर्वसंध्येला झेंडूच्या फुलांची रेलचेल होती.

दसरा म्हटले की नवीन खरेदी आलीच, पगारदार नागरिक दुचाकी आणि चारचाकीच्या खरेदीवर या मुहूर्ताला प्राधान्य देत असल्याने शहरातील दुचाकींच्या स्थापना सजल्या होत्या. अनेकांनी बुकिंग करून उद्या गाडी घेण्याचे निश्चित केल्याचे सांगण्यात आले. यंदा दरवर्षीपेक्षा प्रमाणे थोडे कमी असले तरी दसऱ्यानंतर ते वाढत जाईल अशी विक्रेत्यांना आशा आहे.

यंदा अनेक फायनान्स कंपन्यांनी सुलभ दराने कर्ज उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे त्याचाही परिणाम होऊन विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुवर्णपेढ्यांमध्ये दुपारपासूनच गर्दी दिसून आली. सोन्याचे भाव बऱ्यापैकी आवाक्यात असल्याने प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.

येथे चांदवड, अभोणा, कळवण, दिंडोरी आदी भागातून शेतकऱ्यांनी फुले विक्रीसाठी आणली आहेत. काही व्यावसायिकांनी शेतकऱ्यांकडून फुले आणून येथे दुकाने थाटली आहेत. फुलांची आवक यंदा वाढल्याने दर घसरले आहेत. येथे ५० रुपये किलोने झेंडूंच्या फुलांची विक्री होत आहे. शहरात मोसमपूल चौकाला फुलांच्या दुकानांनी वेढा घातल्याने चौकाला पिवळे व केशरी रंग आला आहे.

सटाणा नाका, एकात्मता चौक, रावळगाव नाका यासह विविध भागात फुले विक्रीसाठी आली आहेत. यावर्षी मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड झाल्याने उत्पादन वाढले आहे. घाऊक बाजारात सुमारे ४० रुपये किलोने फुलांची विक्री झाली. कसमादे परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी शहरात फुले विक्रीसाठी आणली आहेत. आदिवासी पट्ट्य़ातील काही फुलविक्रेते आपल्या कुटुंबासह सायंकाळी येथे दाखल झाले.

येथे साडेतीन फूट फुलांची माळ ५० रुपयाला विकली जात आहे. एक माळ तयार करण्यासाठी ३६ फुलांचा व वेलवेट फुलांचा वापर केला जात आहे. दसऱ्याच्या दिवशी पहाटेपासून येथे फुलविक्रेते येतील. दिवसभर शहरात फुले खरेदी-विक्रीची रेलचेल असेल. तसेच येथे फुलांबरोबर मंगळवारी (ता.२४) आपट्याची पाने विक्रीसाठी दाखल होणार आहेत. फुलांबरोबरच नागरिक आपट्याची पानेही खरेदी करीत आहेत.

''भाव घसरल्याने यंदा फुल विक्रीतून उत्पादन खर्चही निघणार नाही. अभोणा ते मालेगावपर्यंत वाहतुकीचा मोठा खर्च येत आहे. येथे ५० रुपये किलोने किरकोळ विक्री करावी लागत आहे. झेंडूच्या पिवळ्या फुलांना चांगली मागणी आहे.''- साहेबराव साबळे, फुलविक्रेता, अभोणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

Narayana Murthy: UPSC परीक्षेतून नव्हे तर अशा पद्धतीने करा IAS-IPSची निवड; नारायण मूर्तींनी PM मोदींना केले आवाहन

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

SCROLL FOR NEXT