नाशिक : कार्यालयीन कर्मचाऱ्याच्या निवृत्तीनिमित्त थेट आदिवासी विकास भवनांतर्गत असलेल्या कार्यालयातच जेवणाच्या पंगती उठल्याचा प्रकार सोमवारी (ता. २९) प्रकल्प कार्यालयात घडला.
थेट प्रवेशद्वारावरच स्वयंपाकाचा घाट घालण्यात आला. मात्र या कार्यक्रमामुळे कामानिमित्त बाहेरून आलेल्यांना कार्यक्रम संपेपर्यंत ताटकळत उभे राहावे लागले. शासकीय कार्यालयात अशा प्रकारे कार्यक्रम घेणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (occasion of retirement food cooking in staircase of tribal office visitors waited for work Nashik Latest Marathi News)
सोमवारी प्रकल्प कार्यालयातील एका कर्मचाऱ्याची निवृत्ती होती. या वेळी दुपारी शासकीय कार्यालयांत सर्व अधिकारी-कर्मचारी वर्गाचे जेवणाचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी संबंधित केटरर्सकडून थेट प्रकल्प कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच स्वयंपाकाचा घाट घालण्यात आला. येथील जिन्यालगत असलेल्या रिकाम्या जागेतच शेगडी व जेवणाचे इतर साहित्य मांडण्यात आले.
त्यानंतर दुपारी वरिष्ठ अधिकारी कार्यालयातून बाहेर पडताच कार्यालयातील व इतर विभागांतील लोकांनी थेट जेवणासाठी कार्यालयात गर्दी केली. जेवणासाठी संबंधित केटरर्सकडून अधिकाऱ्यांच्या कामाकाजाच्या टेबलचा ताबा घेत वस्तूंची मांडणी आणि सजावट केली. त्यानंतर प्रकल्प कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला.
अभ्यागत राहिले ताटकळत
आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने प्रकल्प कार्यालयांतर्गत येत असलेल्या सर्व तालुक्यांतून विद्यार्थी, पालक आणि इतर नागरिक आपल्या तक्रारी व इतर कामासाठी प्रकल्प कार्यालयात आल्याने कार्यालयात गर्दी होती. मात्र, निवृत्तीनिमित्त झालेल्या जेवणाच्या कार्यक्रमामुळे कार्यालयात आलेल्या अनेकांना ताटकळत बसून राहण्याची वेळ आली. त्यामुळे शासकीय कार्यालयांत अशा प्रकारे कार्यक्रम घेणे कितपत योग्य आहे.? याबाबत वरिष्ठांची परवानगी असते का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.
"निवृत्तीनिमित्त कार्यक्रम शासकीय कार्यालयात होतात. मात्र अशा प्रकारे कार्यालय आणि प्रवेशद्वारावर जेवणाचा घाट घालणे, कार्यक्रम घेणे, कितपत योग्य आहे. या संपूर्ण प्रकारामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावे लागले. त्यामुळे याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज आहे."
-भारती भोये, माजी अध्यक्ष, एकात्मिक अदिवासी प्रकल्प आढावा समिती, नाशिक
"शासकीय कार्यालयात अशा प्रकारे जेवण आयोजित करत अभ्यागतांना ताटकळत ठेवणे योग्य असते का? या प्रकारामुळे कार्यालयात येणाऱ्या-जाणाऱ्या अनेकांना त्रास झाला. असा प्रकार नक्कीच चुकीचा आहे." - लता राऊत, सदस्य आदिवासी आघाडी महाराष्ट्र प्रदेश, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.