hospital owners association  Sakal
नाशिक

VIDEO : रुग्‍णालयांच्‍या समस्‍या शासनाने समजून घ्याव्‍यात

अरुण मलानी

नाशिक : कोरोनाच्‍या दुसऱ्या लाटेत आरोग्‍य सेवा देतांना मानसिक व शारीरीक थकवा आलेला असल्‍याने कोविड रुग्‍णालये बंद करण्याबाबत परवानगी मागितली होती. शासनाने ठरविलेल्‍या नवीन दरांचा आणि या मागणीचा संबंध नाही. रुग्‍णालयांना काही समस्‍या भेडसावत आहेत. या समस्‍या समजून घेत शासनाने निराकरण करणे अपेक्षित आहे, अशी भुमिका हॉस्‍पिटल ओनर्स असोसिएशन नाशिक यांच्‍या पदाधिकाऱ्यांनी मांडली. (hospital owners association officials expect government to understand hospital problems in nashik)

बुधवारी (ता. २) झालेल्‍या पत्रकार परीषदेत असोसिएशनच्‍या पदाधिकार्यांनी सविस्‍तर भुमिका विशद केली. यावेळी डॉ. राज नगरकर म्‍हणाले, की शासनाने दर ठरविण्यापूर्वीच गेल्‍या २९ मेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले होते. त्‍यामुळे शासनाने दर निश्‍चित केल्‍याच्‍या घटनेचा आणि या पत्राचा संबंध नाही. पूर्वी दोन हजार दोनशे रुपयांना मिळणारे ऑक्‍सिजन सिलींडर आता सतरा हजार रुपयांना मिळत आहे. तरी पूर्वीच्‍या दराने ऑक्‍सीजनसह अन्‍य आवश्‍यक बाबी मिळण्याकरीता शासनाने प्रयत्‍न करावे.

असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.रमाकांत पाटील म्‍हणाले, की शारीरीक व मानसिक थकव्‍यामुळे कोविड रुग्‍णालये बंद करण्याबाबत पत्र दिले होते. सचोटीने काम करणार्या वैद्यकीय क्षेत्रावर चुकीच्‍या पद्धतीने सामाजिक दडपण आणणे चुकीचे आहे. डॉक्‍टर, कर्मचार्यांवर होणारे हल्‍ले चिंताजनक आहेत. डॉ. ज्ञानेश्‍वर थोरात म्‍हणाले, की यापूर्वी कोरोना रुग्‍ण वाढीबाबत नाशिकचे नाव राष्ट्रीय स्‍तरावर गेले होते. आता पुन्‍हा चुकीच्‍या पद्धतीने नाशिकचे नाव देशभरात पोहचते आहे. किमान प्रोत्‍साहन मिळत नसेल तर खच्चीकरण केले जाऊ नये, इतकीच माफक अपेक्षा आहे.

वोक्‍हार्टला नोटीस

असोसिएशनतर्फे वोक्‍हार्टला नोटीस बजावत त्‍यांचे म्‍हणणे मांडण्यास सांगितले असल्‍याचे डॉ.थोरात म्‍हणाले. चुकीचे काम करणार्या रुग्‍णालयांचे असोसिएशन कधीच समर्थन करणार नसल्‍याचे पदाधिकार्यांनी सांगितले.

शासनाने चर्चेनंतर धोरणे ठरवावीत

डॉ. नगरकर म्‍हणाले, की रुग्‍णालयांची नोंदणी नुतनिकरणाच्‍या वेळी ऑक्‍सिजन प्रकल्‍पाची अट घातली आहे. प्रकल्‍प उभारणीसाठी ३५ लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. प्रकल्‍पासाठी रुग्‍णालयाच्‍या आवारात तशी जागा उपलब्‍ध असावी लागते. त्‍यामूळे प्रत्‍येक रुग्‍णालयास अटीची पुर्तता करणे शक्‍य नाही. अशात कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापूर्वी प्रशासकीय यंत्रणा, शासनाने वैद्यकीय क्षेत्राशी चर्चा करायला हवी, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

(hospital owners association officials expect government to understand hospital problems in nashik)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Latest Maharashtra News Updates : पाशा पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT