येवला : एकेकाळचे कट्टर शिवसैनिक किशोर सोनवणे यांच्यासह काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
मुंबई येथे मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. (Old Shiv Sainik enter presence of Chief Minister Shinde goodbye of activists in Yeola Nashik Political)
तालुक्यात शिवसेना शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीतले जुने शिवसैनिक ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख किशोर सोनवणे यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश झाला आहे,
तसेच अंदरसूल येथील ग्रामपंचायत सदस्य ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख अमोल सोनवणे, किशोर बागूल, संतोष वल्टे, संदीप शेळके आदींचा शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, संपर्कप्रमुख सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाने व येथील तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी हा प्रवेश करण्यात आला.
प्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके यांनी सत्कार केला. तालुक्यात अनेक आजी-माजी शिवसैनिक शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करीत आहेत.
किशोर सोनवणे यांच्या प्रवेशामुळे शहर व ग्रामीण भागातील काही जुने शिवसैनिक अजून शिंदे गटात दाखल होण्याचे अंदाज वर्तविले जात आहेत. अमोल सोनवणे यांनी प्रवेश केल्यामुळे अंदरसूल गटातही पक्षाची ताकद वाढली आहे.
त्यामुळे येणाऱ्या काळात अजून काही पदाधिकाऱ्यांचे प्रवेश होऊन पक्षाला चेहरे मिळतील, अशी चर्चा रंगली आहे. उर्वरित तालुक्याचा दौरा करून काही नव्या जुन्या चेहऱ्यांना चांगली संधी द्यायची आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येक खेडे पिंजून काढून निष्ठावान शिवसैनिकांना सन्मानाने पक्षात घेऊन त्यांना न्याय देण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून करू, असे तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके यांनी या वेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.