olympic day 2023 First statue of Kavita Raut to be erected at Marathon Chowk nashik news  esakal
नाशिक

Olympic Day 2023 : मॅरेथॉन चौकात उभारणार कविता राऊतचे पहिले शिल्प!

सकाळ वृत्तसेवा

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

Olympic Day 2023 : आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांचे पहिले शिल्प उभारण्याचा निर्णय मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेने घेतला आहे.

गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकात साकारणाऱ्या या शिल्पासाठी आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता पूर्ण झाली असून, एखाद्या ऑलिंपिक धावपटूचा जिवंतपणी पुतळा उभारण्याचे हे राज्यातील पहिलेच उदाहरण ठरणार आहे. (olympic day 2023 First statue of Kavita Raut to be erected at Marathon Chowk nashik news)

प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे मुंबईत शिल्प आहे, तर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा कोल्हापूरला पुतळा उभारला आहे. याच धर्तीवर नाशिकमध्ये मविप्र समाज शिक्षण संस्थेने प्रसिद्ध धावपटू कविता राऊत यांचे शिल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

मविप्र मॅरेथॉनची सुरवात ज्या ठिकाणापासून व्हायची तेथे २३ जून २०१५ ला तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते एका धावपटूंच्या शिल्पाचे उद्‌घाटन झाले होते.

तेव्हापासून या ठिकाणाला मॅरेथॉन चौक असे म्हटले जाते. सद्यःस्थितीत या ठिकाणी धावपटूची ही मूर्ती अस्तित्वात नाही. नवीन मूर्ती बसविण्याच्या प्रस्तावाबाबत संस्था पातळीवर चर्चा झाल्यानंतर नाशिकची सुकन्या कविता राऊत यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकचे नाव पोचले. त्यांचाच पुतळा उभारण्याचा विचार पुढे आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

संस्थेचे क्रीडा प्रशिक्षक हेमंत पाटील यांनी कविता राऊत यांच्याशी संपर्क साधत त्यांची परवानगी मिळवली आहे. त्यामुळे शिल्प साकारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, वाहतूक आणि महापालिकेच्या नियमांमध्ये संस्थेचे ललित कला महाविद्यालय हे शिल्प साकारत आहे. येत्या सहा महिन्यांत हा पुतळा साकारला जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे.

"मविप्र सारखी संस्था माझा पुतळा उभारत असल्याचा आनंद वाटतो. त्यातून एखाद्या खेळाडूला प्रेरणा मिळेल आणि दुसरी कविता राऊत जन्माला येईल असा मला विश्वास वाटतो. जिवंतपणी स्वतःचा पुतळा बघण्याचे भाग्य मला लाभत आहे. यापेक्षा दुसरा आनंद आयुष्यात काय असेल." - कविता राऊत, आंतरराष्ट्रीय धावपटू

"कविता राऊतसारख्या खेळाडूंकडून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता झाली असून, लवकरच हे काम पूर्ण होईल." - अॅड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मालाडमध्ये भाजपाचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT