Survey esakal
नाशिक

Nashik: ‘जलजीवन’च्या कामांची ऑन फिल्ड पडताळणी; कामांबाबत आलेल्या तक्रारींनंतर कार्यकारी अभियंत्यांकडून भेटी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जलजीवन मिशन अंतर्गत कामांच्या वाढत्या तक्रारींवर कोल्हापूर येथे या कामांची चौकशीसाठी थेट मंत्रालयातील समिती दाखल झाली असताना नाशिक जिल्ह्यातील जलजीवनच्या कामांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत,

यासाठी या कामांची तपासणी करण्यासाठी जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका प्रतिभा संगमनेरे यांच्यापाठोपाठ आता प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप सोनवणेही फिल्डवर उतरले आहेत.

सोनवणे यांनी निफाड व नाशिक तालुक्यांतील कामांची तपासणी केली. (On field verification of Jaljeevan works Visits by Executive Engineers after complaints regarding works nashik news)

जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत ग्रामपातळीवरून मोठ्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे यांनी कामांबाबत तक्रारी करत वाभाडे काढले.

तर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर यांनी थेट जिल्हा परिषदेत कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ठिय्या मांडत या योजनेतील सुरू असलेल्या कामांचा पंचनामा केला.

यावर, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी तातडीने १९ मेस जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. या आदेशाप्रमाणे पडताळणी करण्यासाठी ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संगमनेरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने लागलीच ‘ऑन द स्पॉट’ जात कामांची पडताळणी सुरू केली.

मात्र, यावर प्रभारी कार्यकारी अभियंता सोनवणे यांना तपासणीस उतरविले नसल्याने त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यामुळे कार्यकारी अभियंता सोनवणेदेखील आता फिल्डवर उतरले आहेत. श्री. सोनवणे यांनी निफाड तालुक्यातील कानळद गावातील योजनेतील कामाला भेट दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

येथील सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामांची पाहणी करत पाइपाची तपासणीही केली. याशिवाय नाशिक तालुक्यातील गोवर्धन येथील कामालाही त्यांनी भेट देत पाहणी केली.

येथील पाण्याच्या टाकीचे फाउंडेशन पासिंग केले, तसेच, विहिरी बांधकामाची पाहणी करत शहनिशा केली असता कामांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याचे आदेश त्यांनी दिले. कामाची गुणवत्ता राखावी, गुणवत्तेत तडजोड केली जाणार नाही, कामे लवकर पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी केल्या.

ठेकेदारांची देयकांची काटेकोर पडताळणी

दरम्यान, तक्रारींवरून आता जलजीवन मिशनच्या कामांची देयके काढण्यासाठी दाखल होत असलेल्या फायलींची काटेकोरपणे पडताळणी मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी सुरू केली आहे. त्यामुळे अनेक फायलींवर त्रुटी काढल्या जात असल्याची चर्चा आहे.

"जलजीवनच्या सुरू असलेल्या कामांना यापुढे अचानक भेटी देणार आहे. तालुकास्तरावरही शाखा अभियंता, उपअभियंता यांना भेटी देऊन पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत."

- संदीप सोनवणे, प्रभारी कार्यकारी अभियंता, जि. प.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT