Nashik Shivsena News : अठ्ठावीस वर्षांपूर्वी दार उघड बये दार उघड, अशी आर्त हाक महाराष्ट्राच्या जनतेला देत प्रथमच सत्ता मिळविणाऱ्या शिवसेनेला यंदाही पुन्हा तशीच अर्थ हाक महाराष्ट्राच्या जनतेला द्यायची असून, त्यासाठीदेखील नाशिकचे मैदान पुन्हा निवडले आहे.
२३ जानेवारीला शिवसेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होत आहे. त्या तयारीसाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ रविवारी (ता. २४) सातपूर येथील जागेची पाहणी करणार आहे.
त्यापूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांचे शनिवारी (ता. २३) नाशिकमध्ये आगमन झाले. (On January 23 Shiv Sena state level convention is being held in Nashik in wake of election news)
१९९५ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पंचवटी येथील निमानी बसस्थानकाच्या पाठीमागे आरपी विद्यालयाच्या मैदानावर शिवसेनेचे भव्य अधिवेशन झाले. या अधिवेशनात मराठमोळ्या पद्धतीने ‘दार उघड बये दार उघड’ या गोंधळ गीताने शिवसेना व भाजपला सत्तेची दारे उघड केली होती.
महाराष्ट्रात प्रथमच हिंदुत्ववादी सरकार त्या वेळी स्थापन झाले. त्यानंतर २८ वर्षांनी पुन्हा शिवसेनेचे अधिवेशन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. यंदाच्या अधिवेशनाला विशेष महत्त्व आहे. त्याला कारण म्हणजे शिवसेनेमध्ये न भूतो भविष्य एवढी मोठी फूट पडली आहे. तब्बल ४० आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्थापन केली व हीच खरी शिवसेना असल्याचा दावादेखील केला आहे.
निवडणूक आयोगानेदेखील शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. यावरून न्यायालयीन लढा सुरू असला तरी पुढील वर्षी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका असल्याने उद्धव ठाकरे शिवसेनेच्या दृष्टीने निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकीचा एक भाग म्हणून २३ जानेवारीला नाशिक येथे शिवसेनेचे राज्यव्यापी अधिवेशन घेण्याचे नियोजन सुरू आहे.
त्याची पूर्वतयारी करण्यासाठी खासदार संजय राऊत शनिवारी नाशिकमध्ये आले. माजी मंत्री विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, युवा सेनेचे अध्यक्ष वरुण सरदेसाई, शिवसेनेचे नेते अनिल देसाई रविवारी नाशिकमध्ये येणार आहे. राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस नाशिकमध्ये मुक्काम ठोकणार आहे. दोन दिवसीय अधिवेशनाचा समारोप जाहीर सभेने करण्याचे नियोजन असून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा घेण्याचे नियोजन केले जात आहे.
राजकीय वर्तुळाचे लक्ष
संक्रमण अवस्थेतून जाणाऱ्या शिवसेनेसाठी जानेवारी महिना महत्त्वाचा आहे. राज्यस्तरीय अधिवेशनाची तयारी होत असतानाच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचे आरोप करण्यात आले.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात एसआयटी चौकशीदेखील लावली. त्याअनुषंगाने शिवसेनेचे नेते यासंदर्भात रविवारी (ता. २३) काय बोलतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.