Saptashrungi Devi Gad : आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगगडावर सोमवती अमावस्या व दीपपूजना निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. (On occasion of Deep Puja devotees came Saptshringigarh for darshan nashik news)
सोमवती अमावस्येनिमित्त मार्कंडेय पर्वतावर यात्रा भरीत असल्याने बहुतांश भाविक मार्कंडेय पर्वतावरुन दर्शन करून मार्कंडेय पिंप्री बारीतून सप्तशृंगगडाची चढाई करून गडावर दाखल होत होते.
आदिमायेची पंचामृत महापूजा झाल्यानंतर आदिमायेच्या मंदिरातील दिवे बंद करीत दीपप्रज्वलित करून देवीची आरती करण्यात आली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
वणी येथील जगंदबा माता मंदिरातही सोमवती अमावस्या यात्रेसाठी वणी बाजून जाणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. जगदंबा माता मंदिरातही दिव्यांचे विधिवत पूजन करून श्री जगदंबेची आरती करण्यात आली.
"श्री भगवती मंदिराच्या गाभाऱ्यात तूप व तेल याचा अखंड दिवा सुरू असतो. दीप अमावस्या निमित्त नवे जुने दिवे स्वच्छ करून त्यांचे विधिवत पूजन केले. मंदिर गाभाऱ्यांतील विद्युत दिवे बंद करून दीप प्रज्वलित करून आरती करण्यात आली." -धनंजय दीक्षित, अध्यक्ष पुरोहित संघ, सप्तशृंग गड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.