trimbakeshwar esakal
नाशिक

Mahashivratri 2023 : त्र्यंबकेश्वरला पहाटेपासून दर्शनासाठी रांगा; गंगापूजनासह विविध कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : येथे महाशिवरात्रीनिमित्त पहाटे तीनपासून भाविकांची कुशावर्त तिर्थावर स्नानासाठी गर्दी झाली होती.

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) मंदिरात दर्शनासाठी साडेतीनला पूर्व दरवाजात रांगा लागल्या. (On occasion of Mahashivratri devotees thronged Kushavarta Tirtha from 3 in the morning for bathing trimbakeshwar nashik news)

त्याबाहेर गोरक्षनाथ मठापर्यंत पोहचल्या होत्या. देणगी दर्शन रांग देखील पहाटेपासून सुरूच होती. त्रिकाळ पूजे व्यतिरिक्त रात्री महापूजा झाली. भाविकांना दर्शनासाठी अहोरात्र व्यवस्था होती. यावर्षी यात्रेसारखी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

दरम्यान पहाटे तीनला निरंजनी आखाड्यापासून साधू महंत सवाद्य मिरवणुकीने आवाहन आखाड्याकडून कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी आले. दरम्यान गर्भगृहात दर्शनासाठी साधूंचा आग्रह होता, मात्र समजुतीने हा वाद लागलीच मिटला.

महामंडलेश्वर सोमेश्वर, पंचदशनाम जुनाआखाड्याचे महामंडलेश्वर शिवगिरीजी, आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती, गिरीजानंद सरस्वती, निरंजनाचे ठाणापती धनंजयगिरी, नया उदासिनचे ठाणापती गोपालदासजी, बडा उदासिनचे ठाणापती देविदास जी, सिताराम आश्रमाचे नारायण दुसरी,

गोरख आघाड्याचे निर्मलाईनाथ, चेतननाथ, नाथ सुट्या यांच्यासह दशनामी आघाड्याचे ठाणापती, मुक्ती महंत, पुजारी व साधू असे कुशावर्त तीर्थावर पोहचले. तेथे आघाड्याचे पुरोहित त्रिविक्रम जोशी, प्रमोद जोशी,

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

देशमुख गुरुजी व देवळेकर यांनी गंगा भेट पूजा केल्यावर साधू, मंहत, मंडलेश्वर यांनी स्नान करुन सवाद्य मिरवणुकीने त्र्यंबकेश्वर मंदिरात पहाटे चारला दर्शन केले. देवस्थानचे विश्वस्त भूषण अडसरे यांनी आखाड्यांच्या साधू, महंत यांचे प्रतिमा व श्रीफळ देऊन स्वागत केले.

त्र्यंबकराजाची पालखी

दुपारी तीनला त्र्यंबकराजाचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा ठेवून पालखी काढण्यात आली. पालखी पुढे नाशिक व त्रंबकेश्वर येथील बँड पथक व केरळमधील पारंपारिक वाद्ये वादक होते. संपुर्ण शहरात सुंदर रांगोळ्या रेखाटल्या होत्या. काही ठिकाणी फुलांचे गालिचे तयार केले होते. मंदिरातून पालखी पातळी व तेथून जहागिरदार जोगळेकर यांच्या घराकडुन कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी नेण्यात आली.

तेथे अभिषेक पूजा संपन्न झाल्यावर परत सत्यनारायण मंदिराजवळील मंदिरात परतली. ठिक ठिकाणी महिलांनी श्रीं ना औक्षण केले. भाविकांनी ऊसाचा रस, बिल्वपत्रे, कवठफळे देवाला वाहिली. कालपासून मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. आज विश्वस्त चेअरमन न्या. विकास कुलकर्णी, भूषण अडसरे, तृप्ती धारणे, संतोष कदम, संजय जाधव, डॉ. सत्यप्रिय शुक्ल व दिलीप तुंगार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WTC Points Table: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाकडून हिसकावला 'नंबर वन'चा मुकूट; पर्थमधील विजयानंतर कसे आहे फायनलचे समीकरण?

Latest Maharashtra News Updates : शिवसेनेने बोलावलेल्या आमदारांना पुन्हा मतदारसंघात जाण्याच्या सूचना

"आम्हाला आई-बाबा म्हणून निवडलंस" लेकाच्या दहाव्या वाढदिवशी रितेश-जिनिलियाने दिल्या खास शुभेच्छा , "एक उत्तम मुलगा..."

CERC Recruitment 2024: भारत सरकारने जाहीर केली नवीन भरती, 29 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज

Pune: पोलिसांची कामगिरी वाचून व्हाल थक्क; स्मशानभूमीतील लाकडावरुन लावला खुनाचा तपास!

SCROLL FOR NEXT