मनमाड (जि. नाशिक) : शहरातील संभाजीनगर येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह (jewelry) रोख एक लाख ४३ हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वर्षभरापासून शहर परिसरात चोरीच्या (Theft Case) घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिक चिंताग्रस्त झाले आहे. (one and half lakh Robbed at Manmad Nashik Crime News)
राजेश दिलीप कनोजे (वय ३४, रा. मारुती मंदिराच्या पाठीमागे, संभाजीनगर, मनमाड) यांनी मनमाड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने तळमजल्यावरील घरास कुलुप लावून पहिल्या मजल्यावर झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने तळमजल्यावरील घराच्या दरवाजास असलेला कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. दोन कपाटातील लॉकर तोडून त्यातील सोन्या- चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण एक लाख ४३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद सरोवर तपास करीत आहे.
मुसक्या आवळण्याची गरज
शहरात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे नागरीकांमध्ये दहशत आहे. बाहेरगावी जायचे म्हटले तरी नागरीकांना विचार करावा लागत आहे. पोलिसांनी गस्त वाढवून चोरांच्या मुसक्या आवळण्याची गरज असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.