Crime Investigation Team with seized nylon manja. esakal
नाशिक

Nashik Crime News : जुनी तांबट लेनमध्ये एकास नायलॉन मांजासह अटक

भद्रकाली पोलिसांनी नायलॉन मांजासह एकास अटक केली. त्याच्याकडून १५ हजार ७०० रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे २७ गट्टू जप्त केले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : भद्रकाली पोलिसांनी नायलॉन मांजासह एकास अटक केली. त्याच्याकडून १५ हजार ७०० रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे २७ गट्टू जप्त केले. पद्माकर रतिकांत बकरे (वय ५४, रा. जुनी तांबटलेन) असे संशयिताचे नाव आहे.

जुनी तांबट लेन येथे एकजण नायलॉन मांजा विक्री करत आहे, अशी माहिती गुन्हे शोध पथकाचे पोलिस हवालदार संदीप शेळके, पोलिस नाईक लक्ष्मण ठेपणे यांना मिळाली. ()

त्यांनी एका लहान मुलास बनावट ग्राहक म्हणून पाठविले. संशयित बकरे नायलॉन मांजा विक्री करत असल्याची खात्री झाली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीलिस निरीक्षक गुन्हे तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार, पोलिस हवालदार संदीप शेळके, नरेंद्र जाधव, लक्ष्मण ठेपणे, महेशकुमार बोरसे, सागर निकुंभ, योगेश माळी, धनंजय हासे, नारायण गवळी यांनी संबंधित ठिकाणी छापा मारला.

पोलिसांनी घराच्या वरच्या मजल्यावर लपून ठेवलेले नायलॉन मांजाचे गट्टू हस्तगत करून संशयितास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भद्रकाली पोलीलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

कौटुंबिक वारसा जपताना...

SCROLL FOR NEXT