One has to wait at least 2 years to visit Sunder Narayan temple nashik news esakal
नाशिक

Sundarnarayan Mandir News: सुंदरनारायण दर्शनासाठी लागणार 2 वर्षे; निधीची उपलब्धता होताच कामास होणार प्रारंभ

सोमनाथ कोकरे

Nashik News : शहरातील प्राचीन श्री सुंदरनारायण मंदिराच्या गर्भागृहासह शिखराचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र पुढील भागासह अर्ध मंडपाचे काम बाकी असल्याने भाविकांना सुंदरनारायणाच्या मंदिरातील दर्शनासाठी अजून किमान दोन वर्षे वाट पाहावी लागण्याची चिन्हे आहेत.

श्री सुंदरनारायण व कपालेश्‍वर हरिहर भेटीचा सोहळा प्रतिवर्षी रंगतो. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पाच-सहा वर्षांपासून सुरू असल्याने विष्णू भगवानाची मूर्ती मंदिरालगत विधीवत पूजनानंतर ठेवण्यात आली आहे. (One has to wait at least 2 years to visit Sunder Narayan temple nashik news)

या ठिकाणी श्रींची नित्यनेमाने पूजाअर्चाही होत आहे. परंतु गर्भागृहाचे काम पूर्ण झाल्याने आता पूर्वीची त्या ठिकाणी पूर्ववत स्थापना करावी, असा सुंदर नारायण भक्तांचा आग्रह आहे.

मंदिराचा मुख्य भाग म्हणजे गर्भगृह, शिखर व कलशाचे काम पूर्ण झाले. निधीची उपलब्धता, कारागीर आणि कोरोना संकटामुळे हे काम पूर्ण व्हायला पाच सहा वर्ष लागली. आता पुढील मंडप व अन्य काम काही कारणांनी रखडले आहे. हे काम कला कुसरीचे, दगड घडवण्याचे काम आहे. त्यामुळे पुढील कामासाठी वेळ लागणार आहे. चांगले काम हवे असेल तर वेळ द्यावा लागेल, अशी भूमिका ‘पुरातत्त्व’ने मांडली आहे.

सुरक्षिततेचा प्रश्‍न

मंदिराच्या शिखराचा जीर्ण भाग जसा काढून टाकला व पहिल्या दगडासारखाच घडीव नक्षीचा व त्याच मापाचा दगड तयार करून नव्याने शिखर उभे राहिले. त्याच प्रमाणे आता पुढील काम म्हणजे मंडपावरील घुमट तो ही जीर्ण झाला आहे.

त्याचा काही भाग, दगड पडत असतात. मंडप धोकादायक आहे. त्यामुळे भाविकांसाठी मंदिर खुले करता येणार नाही. ते सर्व काम होण्यास किमान दोन वर्ष लागणार आहेत, असे विभागाचे म्हणणे आहे.

"काम पूर्ण न झाल्याने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी श्री सुंदरनारायण मूर्ती मंदिरात लगेच ठेवता येणार नाहीत. याबाबत प्रशासकीय पूर्तता लवकरच केली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या कामास सुरवात होईल." - आरती आळे, संचालक, पुरातत्त्व विभाग

"मूर्ती बऱ्याच दिवसापासून मंदिराबाहेर आहेत. तेथेच पूजा, आरती व धार्मिक विधी केले जातात. मंदिराचे शिखर पूर्ण झाले, त्यामुळे श्री सुंदरनारायणाच्या दर्शनासाठी येणारे भाविक विचारणा करतात. अर्थात आमचे नेहमीच प्रशासनाला सहकार्य राहील." -अमेय पुजारी, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT