On the occasion of Sant Nivrutinath Maharaj Yatra, a crowd of pilgrims and devotees at the CBS bus station to go to Trimbakeshwar. esakal
नाशिक

Sant Nivruttinath Yatrotsav : वारकऱ्यांच्या सेवेसाठी दीडशे बसगाड्या सेवेत!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना महामारीनंतर होत असलेल्‍या संत निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्‍सवाला यंदा वारकरी बांधवांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. भाविकांच्‍या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळातर्फे नाशिक ते त्र्यंबकेश्‍वरदरम्‍यान दीडशे जादा बसगाड्या उपलब्‍ध करून दिल्‍या होत्‍या.

या बसगाड्यांनी प्रवास करण्यासाठी भाविकांची शहर परिसरातील बसस्‍थानकांवर गर्दी झाली होती. (one hundred fifty buses in service to serve pilgrims Sant Nivruttinath Yatrotsav trimbakeshwar nashik news)

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्‍सवाचा उत्‍साह गेल्‍या काही दिवसांपासून बघायला मिळत होता. अनेक भाविक पायी त्र्यंबकेश्‍वरसाठी रवाना झाले होते. तर अनेक भाविकांनी बसगाड्यांनी प्रवास केला. एसटी महामंडळातर्फे शहरातून तसेच तालुका पातळीवरून जादा बसगाड्या उपलब्‍ध केल्‍या होत्‍या.

नाशिक शहरातील मेळा बसस्थानकातून त्र्यंबकेश्‍वरसाठी जादा बस सोडण्यात आल्‍या. या ठिकाणी तात्‍पुरते नियंत्रण कक्षदेखील उभारण्यात आलेले होते. नाशिक ते त्र्यंबकेश्‍वर मार्गावर सुमारे दीडशे बसगाड्या उपलब्‍ध करून दिलेल्‍या होत्‍या. या सुविधेचा वारकरी बांधवांना फायदा झाला.

सिटी बससेवा पुरविणाऱ्या सिटीलिंकतर्फे देखील या मार्गावर बसगाड्या धावत असतात. या गाड्यांनाही प्रवासी भाविकांचा प्रतिसाद मिळाला. परंतु प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाच्‍या बसमुळे भाविकांची सुविधा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मालाडमध्ये भाजपाचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT