Cyber Crime esakal
नाशिक

Nashik Cyber Crime: वर्क फ्रॉम होमच्या नादात एकाने गमावले 9 लाख; सायबर भामट्याने घातला शेतकरऱ्याला गंडा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : यु-ट्युबवरील व्हिडिओला लाईक करून लाखो रुपये कमविण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्याने एका शेतकर्याला तब्बल ९ लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

या प्रकरणी सायबर पाेलिस ठाण्यात सात ते आठ टेलिग्राम, व्हाट्सअॅप नंबरधारक व दाेन बँक खातेदारांविरुद्ध आयटी अॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (One lost 9 Lakhs to work from home scam farmer cheated by cyber prankster Nashik Cyber ​​Crime)

कचेश्वर केरुजी काळुंगे-पाटील (५०, रा. गुरुमहिमा, गुरुनगर, जयाबाई काॅलनी, नाशिकराेड) यांच्या फिर्यादीनुसार, कचेश्वर हे शेती करत असताना आजारी पडले.

त्यामुळे कामधंदा नसल्याने आर्थिक अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे वर्क फ्राॅम हाेमच्या शाेधात असताना त्यांना काही सायबर संशयितांनी व्हाटस्अॅप आणि टेलिग्राममार्फत आॅनलाईन संपर्क केला.

यानंतर कचेश्वर यांना वर्क फ्राॅम हाेम करुन जादा पैसे कमवा, फक्त युटयूबचे व्हिडीओ लाईक करावे लागतील, असे आमिष दाखविले. कचेश्वर यांनी कामास हाेकार देताच संशयितांनी माेबाईलवरील टेलिग्रामला लाईक करण्याचे टास्क पाठविले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हे टास्क लाईक बटनावर टच करत असतानाच संशयितांनी त्यांना ४ ते १० जुलैपर्यंत आयकर व इतर कारणांसाठी प्रथम ५०० ते १००० रुपये पाठविण्यास रिक्वेस्ट पाठविली. त्यानंतर टास्क वाढत असताना दुसरा टास्क देण्यात आला.

यात लिमिट वाढवून विविध कारणे सांगून कचेश्वर यांना विविध पेटीएम आयडी व दाेन बँक खात्यांवर वेगवेगळी रक्कम भरण्यास सांगितले. यात सात दिवसांत कचेश्वर यांनी तब्बल ९ लाख ४३ हजार रुपये विविध अकांउंटला पाठविले.

मात्र परतावा मिळत नसल्याने संशय आला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शहर सायबर पाेलिस ठाणे गाठले. त्यानुसार संशयितांविरोधात नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamala Harris vs Donald Trump election : डोनाल्ड ट्र्म्प आघाडीवर... पण कमला हॅरिस यांचा कमबॅक शक्य; अंतिम निकाल कधी लागणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Captain David Warner: बंदी हटली अन् डेव्हिड वॉर्नरकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली; ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधून मोठी बातमी

Mumbai Weather Update: येत्या काही दिवसात कसं असेल मुंबईचं तापमान? जाणून घ्या एका क्लिकवर..

Andhari Vidhansabha: ऋतुजा लटके पुन्हा मारणार बाजी की मुरजी पटेल देणार धोबीपछाड? अंधेरी पूर्वेत दोन्ही शिवसेनांमध्ये चुरशीची लढत

SCROLL FOR NEXT