Buddha Cave In Nashik Sakal
नाशिक

नाशिकमध्ये आढळली तिसरी प्राचीन बुद्ध लेणी!

सुनील खरे

चारच दिवसांपूर्वी सापडलेल्या दोन भिक्खू निवासगृहानंतर, आज नाशिकमध्ये आणखी एक प्राचीन भिक्खू निवासगृह त्रिरश्मी डोंगरावर सापडली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये एके काळी बौद्ध धम्माचे मोठे प्रस्थ होते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

नाशिक : येथे आज (दि.२४) पुन्हा एक प्राचीन अपूर्ण बुद्ध लेणी (Buddha Cave) त्रिरश्मी डोंगरावर (Trirashmi Hill) सापडली आहे. सध्या कोरोनाच्या (Coronavirus) सुट्टीच्या काळात अनेक स्थानिक हौशी गिर्यारोहक या डोंगरावर फिरायला जातात, मात्र काही अभ्यासू लोक काही विशेष माहितीच्या शोधात फिरत असतात. चारच दिवसांपूर्वी सापडलेल्या दोन भिक्खू निवासगृहानंतर, आज नाशिकमध्ये आणखीन एक प्राचीन भिक्खू निवासगृह त्रिरश्मी डोंगरावर सापडली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये एके काळी बौद्ध धम्माचे (Buddha Dhamma) मोठे प्रस्थ होते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. (one more ancient buddhist cave found at trirashmi leni hill nashik)

काळ इ.स.पूर्व २०० ते २५० असण्याची शक्यता

नाशिकचे वरिष्ठ संरक्षक सहायक राकेश शेंडे, अतुल भोसेकर, पुरातत्वविद मैत्रेयी भोसेकर, लिपीतज्ञ सुनील खरे, वरिष्ठ कर्मचारी सलीम पटेल आणि साक्षी भोसेकर या चमूने आज सकाळी त्रिरश्मी डोंगरावर सर्वेक्षण करीत असताना, एका कपारीत ही झाडाझुडपांनी झाकलेली अपूर्ण लेणी दिसली. या अपूर्ण अवस्थेतील भिक्खू निवासगृहच्या संरचनेवरून व पुरातत्वीय अभ्यास केल्यानंतर या लेणीचा कोरण्याचा काळ इ.स.पूर्व २०० ते २५० असू शकते असे ट्रिबिल्सचे अध्यक्ष अतुल भोसेकर म्हणाले. यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व बुद्धलेणींच्या कालमपणाच्या (Chronology) तारखेत बदल होऊ शकतो असे त्यांनी सांगीतले.

लेणी २२७० वर्षे जुन्या

आज पर्यंत नाशिकची जगप्रसिद्ध त्रिरश्मी बुद्ध लेणी समूहाचा काळ इ.स.पूर्व २०० ते इ.स.६०० समजला जात होता. परवाच्या दोन भिक्खू निवासगृह आणि आज सापडलेली अपूर्ण भिक्खू निवासगृह हे इ.स.पूर्व २०० ते इ.स.पूर्व २५० काळ असावा असे पुरातत्वीय प्रमाणांवरून दिसते. म्हणजेच या लेणीं २२७० वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणींचे कालमापन अजून प्राचीन झाले आहे. पुरातत्वविद मैत्रेयी भोसेकर या लेणींचे दस्तऐवजीकरण (documentation) करीत असून लवकरच ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षणला सादर केले जाणार आहे. येत्या २५६५व्या बुद्ध पौर्णिमेच्या एक दिवस पूर्वसंध्येला सापडलेल्या या नवीन बुद्धलेणींमुळे इतिहासप्रेमी, पुरातत्वविद आणि लेणी संवर्धकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

त्रिरश्मी लेण्यांच्या वरच्या थरावर ३ नवीन लेण्या शोधून काढल्या आहेत. लेण्यांचे निश्चितपणे जतन व संवर्धन केले जाईल तसेच रेखांकन व दस्तावेज़ीकरण कार्य केली जातील आणि लवकरच पाथवे व रेलिंगचे कामही केले जाईल. अस्तित्त्वात असलेल्या लेण्यांच्या थरापेक्षा आणखी काही गुहा अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण तर्फे संयुक्त रित्या सर्वेक्षण केले जाईल.

- राकेश शेंडे, वरिष्ठ संरक्षक सहायक, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण

आज सापडलेले भिक्खू निवासगृह हे निश्चितच त्रिरश्मी बुद्धलेणीं समूहापेक्षा प्राचीन आहे आणि लेणी कोरण्याची प्राथमिक अवस्था दर्शविते. ही लेणीं २२०० वर्षांपेक्षा किंवा त्यापेक्षाही जुनी असावी. यामुळे संशोधकांना लेणीं करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करता येईल.

-मैत्रेयी भोसेकर, पुरातत्वविद आणि लिपीतज्ञ

(one more ancient buddhist cave found at trirashmi leni hill nashik)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT