Nashik Onion Auction : जिल्ह्यातील कांदा व्यापारी असोसिएशनने विविध मागण्यांकरिता मुख्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करूनही मागण्या मान्य न झाल्याने कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केल्यामुळे जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांमध्ये हजारो क्विंटल कांद्याचे व्यवहार थांबले आहेत.
मात्र, बुधवार (ता. २१) सकाळी नाशिकच्या शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात कांदा लिलाव सुरळीत पार पडले. (Onion auction in Nashik market committee goes smoothly)
(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)
==
येथे व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा कोणताही परिणाम जाणवला नाही. तर १८४० क्विंटल कांदा आवक झाला असून सरासरी बाराशे रुपये तर सर्वाधिक सोळाशे रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला.
केंद्र सरकारने देशातून होणाऱ्या कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. निर्यातीवरील निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहील. शनिवारी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत मागण्यांवर तोडगा निघाला नव्हता.
जिल्ह्यातील १७ बाजार समित्या बेमुदत बंद राहणार असल्याने एका दिवसात साधारणतः ३० ते ४० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा शेतकरी माल विक्री करण्याकरिता अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहे.
कांदा आवक, बाजारभाव
शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड येथे कांदा एकूण १८४० क्विंटल, तर १९ क्विंटल लसूण आवक झाला. उन्हाळी कांदे यात खाद कांदा सरासरी पाचशे रुपये तर सर्वाधिक आठशे रुपये प्रतिक्विंटल, चोपडे कांदे सरासरी सातशे तर सर्वाधिक बाराशे रुपये प्रतिक्विंटल,
गोलटा कांदे सरासरी बाराशे तर सर्वाधिक सोळाशे रुपये प्रति क्विंटल, कांदा (सुपर) सरासरी अठराशे, तर सर्वाधिक चोवीसशे प्रतिक्विंटल, लसूण (एमपी) सरासरी दहा हजार सर्वाधिक चौदा हजार रुपये प्रतिक्विंटल, गावठी लसूण सरासरी सोळा हजार तर सर्वाधिक एकोणाविस हजार रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.