onion auction esakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यात आजपासून कांदा लिलाव

दीपक अहिरे

नाशिक : कोरोना संसर्ग (coronavirus) रोखण्यासाठी १२ मेपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये बंद असलेल्या जिल्ह्यातील बाजार समित्या (market committee) कोरोना नियमांचे पालन करून सोमवारी (ता. २४) सुरू होत आहेत. नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच (farmers) लिलावात सहभागी होता येणार असून, आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळपासूनच बाजार समितीमध्ये अहवाल तपासून वाहनांना प्रवेश दिला जात होता. (onion-auction-start-nashik-district-marathi-news)

कांदा आवकेने गजबजली पिंपळगावनगरी

दहा दिवसांनंतर होणार बाजार समितीत लिलाव

पिंपळगाव बाजार समितीचे ठप्प असलेले कांदा लिलाव दहा दिवसांनंतर सोमवारी (ता. २४) सुरू होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर रविवारी (ता. २३) सायंकाळी शेकडो वाहने दाखल झाली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा चाचणी अहवाल तपासला जात होता. बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर स्वत: प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांना कोरोनासंबंधी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करीत होते. कांदा आवकेने पिंपळगाव बाजार समिती आवार गजबजून गेले आहे.

कोरोनाचा आलेख उंचावल्यानंतर जिल्ह्यासह पिंपळगाव बाजार समितीचे लिलाव बंद होते. आमदार बनकर यांनी लिलाव सुरू करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. शिवाय जिल्ह्यातील लॉकडाउन शिथिल होत असल्याने आजपासून पिंपळगाव बाजार समितीचे कामकाज सुरू होत आहे. रविवारी सायंकाळपर्यंत हजार वाहनातून सुमारे २५ हजार क्विंटल कांदा आवक झाली. या वेळी बाजार समितीचे संचालक सोहनलाल भंडारी, उमेश जैन, सचिव बी. एस. बाजारे, सागर भंडारी आदी उपस्थित होते.

प्रशासनाच्या नियमावलीनुसार बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी कोरोना चाचणी अहवाल दाखविणे बंधनकारक करण्यात आले आहे. अहवाल नसेल तर प्रवेश दिला जाणार नाही. कोविड संसर्ग रोखण्याबरोबरच बाजार समितीचे कामकाज सुरळीत सुरू राहण्यासाठी शेतकऱ्यांनी तपासणी करावी. व्यापारी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आदी नियम पाळून लिलाव पुकारतील. -आमदार दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बाजार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 : शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना..! अखेर ५६ जागा जिंकत शिक्कामोर्तब

Nagpur South Assembly Election 2024 Result: प्रतिष्ठेची लढत भाजपने जिंकली, नागपूर दक्षिण मतदारसंघात भाजपचे मोहन मते यांचा विजय

Sports Bulletin 23rd November: पर्थ कसोटीत भारताकडे भक्कम आघाडी ते उद्या आयपीएल २०२५ चा मेगा ऑक्शन रंगणार

Rohit Pawar Won Karjat-Jamkhed Assembly Election 2024 Result Live: रोहित पवारांचा अटीतटीचा विजय; राम शिंदेंना दुसऱ्यांदा दिली मात

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : दक्षिण नागपूर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे मोहन मते 15573 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT