कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार (ता.२४) पासून कांदा व भुसार लिलाव सुरू होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची एकच गर्दी होण्याची दाट शक्यता गृहित धरून शेतमाल विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची कोरोना तपासणी करूनच बाजार समितीत प्रवेश दिला जाणार
येवला (जि. नाशिक) : कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार (ता.२४) पासून कांदा व भुसार लिलाव सुरू होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची एकच गर्दी होण्याची दाट शक्यता गृहित धरून शेतमाल विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची कोरोना तपासणी करूनच बाजार समितीत प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती मुख्य प्रशासक वसंत पवार यांनी दिली. गुरुवारी (ता. २०) व्यापारी व कर्मचाऱ्यांची ७२ जणांची चाचणी करण्यात आली. येथील पोलिस ठाण्यात झालेल्या बौठकीत दिलेल्या सूचनांननुसार हा निर्णय घेण्यात आला. उपविभागीय पोलिस ठाण्यात समीरसिंग साळवे यांनीदेखील सूचना दिल्या. (Onion auctions will start from Monday at Yeola)
कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य आवार येवला व उपबाजार अंदरसूल आवारावरील कांदा, मका, भुसारा धान्य व भाजीपाला शेतीमालाचे लिलावासाठी येणा-या प्रत्येक शेतकरी व इतर बाजार घटकांची कोरोणाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोमवारपासून प्रशासनाच्या आदेशानुसार शेतमाल लिलाव चालू होण्याची शक्यता असल्याने बाजार समितीचे आवारात प्रवेश करताना प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. तसेच शेतकर्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आदल्या दिवशी बाजार समितीत मुक्कामी येऊ नये. ज्या दिवशी लिलाव असेल त्या दिवशी सकाळनंतरच आवारात यावे. वाहनासोबत फक्त एकाच व्यक्तीस प्रवेश दिला जाणार असून, त्या व्यक्तीची बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच कोरोना चाचणी करण्यात येईल.
त्याचप्रमाणे बाजार समितीच्या सर्व घटकांना कोरोना चाचणी करूनच आवारात प्रवेश दिला जाणार आहे. शासनामार्फत तसेच स्थानिक प्रशासनामार्फत कोरोना महामारीसंदर्भात वेळोवेळी निर्गमित होणा-या सूचनांचे व आदेशाचे काटेकोरपणे पालन करून बाजार समितीस सहकार्य करावे, असे आवाहन बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंत पवार, सचिव के. आर. व्यापारे व सर्व प्रशासकीय संचालक मंडळाने केले आहे. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात आज ७२ अधिकारी, कर्मचारी, माथाडी, मापारी कामगार व व्यापार्यांची कोरोना चाचणी करण्यात आलेली आहे. ज्यांची चाचणी राहिली त्यांची चाचणी शुक्रवारी केली जाणार असून लिलाव सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर ही पूर्वतयारी केली जात असल्याचे पवार यांनी सांगितले.
नियमांचे पालन करावे
याअगोदर ज्या शेतक-यांनी व व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. त्यांनी कोरोना चाचणीचा रिपोर्ट बरोबर आणावा. शेतकऱ्यांनी बाजार समितीत आल्यानंतर वाहनामध्ये किमान ३ ते ५ फूट अंतर सोडावे व वाहने रांगेत उभी करावी. ज्या वाहनाचा लिलाव सुरू असेल, त्या शेतक-यानेच वाहनाजवळ थांबावे, इतरांनी आपआपल्या वाहनाजवळ थांबावे व गर्दी करू नये, सर्वांनी सोशल डिस्टन्सगचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
(Onion auctions will start from Monday at Yeola)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.